या मोबाईलमध्ये चालणार नाही Chrome ब्राऊजर
या मोबाईलमध्ये चालणार नाही Chrome ब्राऊजर
गूगलने आपल्या प्रसिद्ध वेब ब्राऊझर Chrome संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट 2025 पासून Android 8 (Oreo) आणि Android 9 (Pie) या जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या मोबाईल डिव्हाइसेससाठी Chrome चं सपोर्ट बंद होणार आहे. म्हणजेच या अँड्रॉइड व्हर्जन्सवर Chrome ला ना कोणतेही अपडेट्स मिळतील, ना सुरक्षा पॅचेस, ना नवीन फीचर्स. Chrome लगेचच काम करायचं थांबवणार नाही. पण त्याला भविष्यात कोणतेही अपडेट्स न मिळाल्याने बग्स, सिक्युरिटी लूपहोल्स आणि डेटा रिस्क वाढू शकते. विशेषतः जे वापरकर्ते इंटरनेटवर बँकिंग, ईमेल्स किंवा अन्य संवेदनशील काम करतात त्यांच्यासाठी हे अधिक धोकादायक ठरू शकतं.
जर तुम्ही अजूनही Android 8 किंवा Android 9 वर चालणारा मोबाईल वापरत असाल आणि Google Chrome वापरत असाल, तर तुम्हाला लवकरात लवकर फोन अपडेट करण्याची गरज आहे. Chrome 139 चा नवीन अपडेट ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 5 ऑगस्ट 2025 च्या सुमारास रिलीज होणार आहे. त्यानंतर फक्त Android 10 आणि त्यापेक्षा वरच्या व्हर्जन्सवर चालणाऱ्या डिव्हाइसेससाठीच Chrome चे अपडेट्स मिळतील.
Android 8 किंवा 9 वापरणाऱ्या यूजर्ससाठी Chrome 138 हे अंतिम वर्जन ठरेल. म्हणजे यानंतर कोणतीही सुधारणा, सुरक्षा अपग्रेड्स किंवा नवीन फिचर्स मिळणार नाहीत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade