ही भारतीय अभिनेत्री झाली मालदिवची पर्यटन राजदूत
ही भारतीय अभिनेत्री झाली मालदिवची पर्यटन राजदूत
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ यांची नुकतीच मालदीवच्या जागतिक पर्यटन राजदूत (Global Tourism Ambassador) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. Visit Maldives या अधिकृत संस्थेने ही घोषणा करताना म्हटलं की, “कतरिना ही लक्झरी, शांतता आणि सौंदर्याचं प्रतीक आहे—मालदीवच्या आत्म्याशी ती पूर्णपणे सुसंगत आहे.” ही नियुक्ती मालदीवच्या “Sunny Side of Life” या प्रचार मोहिमेचा भाग असून, भारत, युके, रशिया, जर्मनी, इटली यांसारख्या देशांमध्ये पर्यटन वाढवण्याचा उद्देश आहे.
ही घोषणा अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा भारत-मालदीव संबंधांमध्ये सुधारणा घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जानेवारी २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप भेटीनंतर काही मालदीवच्या मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. यानंतर #BoycottMaldives हा ट्रेंड सोशल मीडियावर गाजला आणि भारतीय पर्यटकांची संख्या सुमारे ३३% नी घटली होती. या पार्श्वभूमीवर कतरिनाची निवड ही केवळ ब्रँडिंग नव्हे, तर भारत-मालदीव संबंधांमध्ये सौहार्द निर्माण करण्याचं धोरणात्मक पाऊल मानली जात आहे.
कतरिनाने आपल्या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटलं, “मालदीव हे लक्झरी आणि नैसर्गिक सौंदर्याचं शिखर आहे—जिथे सौंदर्य आणि शांतता एकत्र येतात. ‘Sunny Side of Life’ चं प्रतिनिधित्व करणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. जगभरातील लोकांना मालदीवच्या अद्वितीय अनुभवांची ओळख करून देण्यासाठी मी उत्सुक आहे”.
Visit Maldives ने कतरिनाच्या माध्यमातून नवीन जाहिरात मोहिमा, सोशल मीडिया कॅम्पेन आणि विशेष पर्यटन सवलती सुरू केल्या आहेत. यामध्ये लक्झरी रिसॉर्ट्स, बुटीक हॉटेल्स आणि कौटुंबिक पॅकेजेस यांचा समावेश आहे. ही मोहीम केवळ भारतापुरती मर्यादित नसून युके, रशिया, जर्मनी, इटली, स्पेन, पोलंड यांसारख्या देशांमध्येही राबवली जात आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya