Breaking News
अश्लील शो ‘हाऊस अरेस्ट’ वर महिला आयोगाकडून बंदी
मुंबई,-उल्लू या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रसारित होणाऱ्या हाउस अरेस्ट या शो मध्ये होस्ट एजाज खान सहभागी महिला, पुरुषांना अश्लील प्रश्न विचारून आक्षेपार्ह प्रात्यक्षिक करून दाखवण्यास सांगत आहे, महिलांना अंगावरील कपडे उतरविण्यास सांगून त्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. असे व्हिडियो समाज माध्यमातून समोर येत आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोगाने एजाज खान याचा ‘हाऊस अरेस्ट’ शो बंद करण्याचे तसंच आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी देखील या शो वर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, ” मोबाईलमधला हा कंटेंट लहान मुलांपर्यंत सहज पोहोचतो आहे. असे शो म्हणजे फक्त संस्कृतीची अवहेलना नाही, तर समाजाच्या आरोग्याची विटंबना आहे. हे शो म्हणजे भावी पिढ्यांच्या मानसिकतेवर विकृत घाला आहे, असं म्हणत त्यांनी या शोवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली होती.”
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar