प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ , चित्रपट ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध
प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ , चित्रपट ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध
ट्रेण्डिंग
मुंबई - प्राजक्ता माळी निर्मिती आणि अभिजीत ‘फुलवंती’ चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. प्राजक्ताचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘फुलवंती’ ११ ऑक्टोबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. मात्र त्यात एक ट्विस्ट आहे. तो प्रेक्षकांना मोफत पाहता येणार नाही. प्राजक्ताने यासंदर्भात पोस्ट करून माहिती दिली आहे.
प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. त्यात तिने ‘फुलवंती’ चित्रपट आता ओटीटीवर उपलब्ध आहे, अशी माहिती दिली. प्रेक्षकांना ‘फुलवंती’ सिनेमा घरबसल्या पाहता येईल. मात्र त्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागणार आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर रेंट देऊन पाहता येईल.
पुणे- मुंबई- नाशिक बाहेरचे प्रेक्षक, सातत्याने ‘फुलवंतीच्या’ शोबद्दल विचारणा करत होते. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. अमेझॉन प्राइमवर टिकिट काढा आणि घरबसल्या चित्रपट पाहा,” असं कॅप्शन देत प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. म्हणजेच ‘फुलवंती’साठी पैसे मोजावे लागतील. प्राइम व्हिडीओचे सबस्क्रिप्शन असूनही तो मोफत पाहता येणार नाही.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya