कंगनाच्या Emergency ला सेन्सॉरकडून ग्रीन सिग्नल
कंगनाच्या Emergency ला सेन्सॉरकडून ग्रीन सिग्नल
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आणि विद्यमान भाजप खासदार कंगना राणौतचा Emergency हा चित्रपट बराच काळापासून सेन्सॉरच्या कचाट्यात अडकला होता. आज अखेर त्याला सेन्सॉरकडून मान्यता मिळाली आहे. या चित्रपटात कंगनाने दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती कंगनाने दिली. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
कंगना रणौतने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर इमर्जन्सी सिनेमाविषयी पोस्ट शेअर करत लिहिलं की, आम्ही लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करू. तुमच्या संयम आणि समर्थनाबद्दल मी कृतज्ञ आहे. अभिनयासोबतच कंगनाने या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे. अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी असे अनेक कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
कंगनाचा चित्रपट यापूर्वी ६ सप्टेंबर २०२४ रोजी रिलीज होणार होता. मात्र शीख संघटनांच्या विरोधानंतर सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. . या चित्रपटात त्यांच्या समाजाची चुकीची प्रतिमा मांडण्यात आल्याचा आरोप शीखांनी केला आहे. १४ ऑगस्टला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता, तेव्हापासून या चित्रपटावरुन वाद निर्माण झाला होता. पंजाबमध्ये या चित्रपटाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली आणि त्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट पास करण्यासाठी अटी ठेवल्या होत्या. चित्रपटातील काही दृश्यांवर त्यांनी आक्षेप घेतला. सिनेमामध्ये काही बदल करण्याचे आदेश न्यायालयाकडून निर्मात्यांना देण्यात आले होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya