ह्या वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे जागतिक परिणाम आणि महाराष्ट्राचे भविष्य
ह्या वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे जागतिक परिणाम आणि महाराष्ट्राचे भविष्य
मुंबई -:या वर्षातील दुसरे व शेवटचे सूर्यग्रहण (Solar Eclipse) दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार असून, रात्री ९:१३ वाजता सुरू होईल आणि पहाटे ३:१७ वाजता संपेल. हे कंकणाकृती सूर्यग्रहण कन्या राशी आणि हस्त नक्षत्रावर अधिक प्रभाव पाडणारे असेल.
या ग्रहणाचा योग आश्विन महिन्याच्या अमावस्या तिथीला, पितृपक्षाच्या अमावस्येला आहे. ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी नवरात्रोत्सव सुरू होणार आहे. दक्षिण अमेरिकेचा उत्तरेकडील भाग, आर्कटिक, अर्जेंटीना, ब्राझील, पेरू, फिजी, चिली, पेरू, होनोलूलू, ब्यूनस आयर्स, अंटार्कटिका आणि अमेरिका व दक्षिण प्रशांत महासागरातील काही भागांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे.
या ग्रहणामुळे रोग,संघर्ष,दुर्घटना आणि विवाद यात वाढ होईल.
या काळात जगात/देशात मोठी अस्वस्थता पसरेल. देशाच्या सरहद्दीवर /बॉर्डरवर गडबड,बंड तसेच अत्याचार होण्याची शक्यता.
याच दरम्यान हवेतून/अवकाशातून हल्ल्याच्या घटना घडतील.अतिरेकी/दहशतवादी कारवाया, तसेच काही देशविरोधी कारवाया घडताना दिसतील. अचानक आक्रमण/हल्ल्याची शक्यता.
अग्निकांडाच्या घटना तसेच घटना घडताना मदत करणाऱ्या लोकांना प्रतिकूल/मृत्यूची शक्यता
काही ठिकाणी पोलीस/मिलिटरी यांना पाचारण करावयास लागेल. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल.
पोलिसांविषयी वादविवाद वाढतील. त्यांच्या संबंधित भ्रष्टाचाराची प्रकरणे उजेडात येतील.
सरकार व विरोधी पक्ष यांच्यात सलोखा नांदणार नाही. या काळातील निवडणुकांमध्ये सरकार पक्षाला प्रतिकूल यश.सत्तापरिवर्तनाचे योग.
देशातील विरोधी पक्षाकरिता उत्तम काळ /विरोधी पक्ष बलवान होईल. विरोधी पक्षाचे बोलणे प्रभावी ठरेल.
मंत्र्यांवर/पदाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप. सरकारप्रति जनभावना तीव्र होतील.
पक्षविरोधी कारवाया तसेच पक्ष फोडाफोडीचे प्रकार घडताना दिसतील.( आमदार /खासदार यांची पळवापळवी)
अनेक समाज विघातक कृत्ये घडताना दिसतील.शिक्षणविषयक चळवळी घडतील. जगात/देशात चोऱ्या/मारामाऱ्या/दरोडे यांच्या संख्येत लक्षणीय वाढ. आधुनिक पद्धतीचे तसेच अत्यंत चातुर्याने केलेले गुन्हे घडतील.स्फोटक घटनेपासून राजघराणी/मंत्री यांना धोका.
अपघाताचे प्रमाण वाढेल.रेल्वेचे मोठे अपघात घडतील. पिकांची हानी. तसेच खाणीतील किंवा भूकंपामुळे मोठी हानी. जगातील/देशातील बेकारी तसेच मृत्युसंख्येत वाढ होईल.
मोठी वादळे /ज्वालामुखी होतील. काही ठिकाणी प्रचंड पावसामुळे व पुरामुळे पिकांचे नुकसान वाल,वाटाणे,मूग कापूस या पिकांना धक्का लागेल. काही ठिकाणी प्रचंड पावसामुळे व पुरामुळे पिकांचे नुकसान. नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास
तेलाचे /तुपाचे भाव वाढतील. चणे/गहू /धागा/दोरे/रूई /स्टील /कापूस यामध्ये १ ते दीड महिन्यानंतर तेजी (भाव वाढतील )
हवेतील उष्णतेचे प्रमाण प्रचंड वाढेल. ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवेल.
मोठ्या/प्रसिद्ध/अधिकारावर बसलेल्या/तसेच राजघराण्यातील व्यक्ती यांच्यावर संकटे येतील. अधिकारीवर्गावर लाच तसेच फितुरीचे आरोप होतील. पत्रकारांवर खटले दाखल होतील.
या काळात खोटी औषधें निर्माण करणारी तसेच भेसळ करणारी,ढोंगी/धर्माच्या नावाखाली कुकर्मे करणारी,लुबाडणाऱ्या लोकांची प्रकरणे उजेडात येतील.
तुरुंगातून कैदी पळून जाण्याचे प्रकार घडतील.तुरुंगात आग लागण्याचे प्रकार
परदेशातून गुन्हेगार हस्तांतरित होतील. विश्वस्त /संचालक याना तुरुंगवास
धार्मिक बाबतीत भानगडी निर्माण त्यामुळे अस्वथता व खळबळ माजते.
आरोग्याच्या/रोगराई (स्पर्शजन्य/संसर्गजन्य/ विचित्र विकार) समस्या उत्पन्न होतील भयंकर रोगाच्या साथी उदभवतील. विषबाधेचे प्रकार.
वकील/बॅरिस्टर/ धर्माचे उपदेशक/डॉक्टर/ साहित्यकार यांना प्रतिकूल.
नदीनाले/समुद्र यात अपघात घडतील.खाणी/विहीर/इमारती/तलाव/नदीनाले/समुद्र यात अपघात घडतील.
कायदेमंडळात तसेच समाजात जोराचे वादविवाद ,वृत्तपत्रांमध्ये टीका तसेच वाड्मयप्रतिबंधक गोष्टी घडतील. कोर्टात अब्रुनुकसानीचे खटले उभे राहतील.
शिक्षण/शाळा/व अनाथगृहे याना प्रतिकूल काळ.जगात/देशात दळणवळण,पोस्ट-तारखाते ,रेल्वेखाते,एसटी महामंडळ,खाजगी बस सेवा, कुरियर सर्व्हिस,टेलेफोन खाते,फॅक्/केबल याना अडचणींना तोंड द्यावे लागेल.
काही कार्यक्रमात/संमेलनात/स्पर्धेत खंड पडताना दिसेल.
शेअर बाजारात तेजी
महाराष्ट्र राज्यावरील परिणाम
ग्रहणाच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अस्थिरता जाणवेल. लवकरच निवडणूक जाहीर होतील. सत्ताधारी पक्षाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. तिकीटवाटपात काही नेत्यांना (सत्ताधारी) अपमान सहन करावा लागेल. नाचक्की होईल.बंड/दुफळी माजेल. बेदिली घडेल. राजीनामे सत्र सुरु होईल. चंद्रग्रहणाच्या लेखात देखील महाराष्ट्रासंबंधित मत मांडले आहे.
चंद्रग्रहण /नूतन वर्ष / देशात कोणाची सत्ता येईल/सूर्यग्रहण /राहूकेतूपरिवर्तन/गुरुचा राशी बदल/ तसेच महाराष्ट्र राज्यातील अनपेक्षित घडामोडी
यासंबंधीच्या विश्लेषणाच्या लिंकस् खाली दिलेल्या आहेत
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant