या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षपदी आशुतोष गोवारीकर
या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षपदी आशुतोष गोवारीकर
सांस्कृतिक
मुंबई - अजिंठा- वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५ च्या अध्यक्षपदी प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची निवड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे 15 ते 19 जानेवारी 2025 पर्यंत हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल आणि मुख्य संरक्षक अंकुशराव कदम यांच्या नेतृत्वाखालील आयोजन समितीने महोत्सवाची माहिती दिली. अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षपदी आशुतोष गोवारीकर यांची निवड करण्यात आली असून महोत्सवाच्या संचालकपदी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुनिल सुकथनकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते सुनील सुकथनकर हे देखील या आवृत्तीसाठी महोत्सव संचालक म्हणून काम पाहतील. माजी दिग्दर्शक अशोक राणे यांच्या जागी, ज्यांचा कार्यकाळ नुकताच संपला आहे. सुकथनकर यांनी गेल्या 30 वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
आशुतोष गोवारीकर मराठी दिग्दर्शकाने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या उत्तुंग कामाने नाव कमावले आहे. गोवारीकर यांनी आपल्या अभिनय, दिग्दर्शन व निर्मिती प्रक्रीयेने भारतीय चित्रपटसृष्टीत मागील तीन दशकांपासून भक्कम योगदान दिले आहे. भारतीय सिनेमा ऑस्करपर्यंत पोहोचवणारे हे प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते आहेत. त्यांनी लगान, स्वदेश, जोधा अकबर, पानिपत अशा ऑस्कर नामांकीत सिनेमांचं दिग्दर्शन केलं असून चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनातील हे मोठे नाव आहे. मागील २५ ते ३० वर्षांपासून भारतीय सिनेमाचं जगभरात उल्लेखनीय नाव होण्यात गोवारीकरांचा मोठा सहभाग आहे. लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आशुतोष गोवारीकर यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही छाप सोडली आहे.
नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत व मराठावाडा आर्ट कल्चर व फिल्म फाऊंडेशनच्या वतीने मागील ९ वर्षांपासून अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव छत्रपती संभाजीनगर येथे आयोजीत केला जातो. केंद्र सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालय, एनएफडीसी व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यानं हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. यंदा या चित्रपट महोत्सवाचं १० वं वर्ष आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya