सोनाक्षी सिन्हा आणि झहीरची न्यूयॉर्कमध्ये भटकंती
सोनाक्षी सिन्हा आणि झहीरची न्यूयॉर्कमध्ये भटकंती
मनोरंजन
मुंबई - सोनाक्षी झहीरसोबत लग्न झाल्यानंतर खूप खूश आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती की, झहीरसोबत लग्न झाल्याने मी खूप आनंदात आहे. कारण खूप दिवसांपासून मी या क्षणाची वाट बघत होते. मला झहीरसोबत वेळ घालवता येतोय, याचा एक वेगळा आनंद आहे. काम करणं आणि काम संपल्यानंतर घरी जाऊन रोज झहीरला भेटणं, हे रुटीन मला खूप आवडतंय. लग्न थोडं आधीच व्हायला हवं होतं. पण उशीरा का होईना माझं आणि झहीरचं लग्न झालंय, यामुळे मी समाधानी आहे.
सोनाक्षी असंही म्हणाली होती की, लग्न झालेलं असल्यामुळे आता मी झहीरसोबतचे फोटो बिनधास्त शेअर करु शकते. आता काही लपवावं लागणार नाही, यामुळे बरं वाटत आहे. सोनाक्षी आणि झहीर लग्नाआधी 7 वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. त्यावेळी फक्त जवळच्या मित्र – मैत्रिणींसोबत ते फोटो शेअर करायचे. तुम्ही कोणावर तरी प्रेम करताय आणि तुम्हाला हे जगाला सांगता येणार आहे, ही भावनाच खूप वेगळी आहे. लग्नाआधीचे आमचे खूप सुंदर फोटो शेअर करता आले नव्हते, पण आता त्यात काही अडचण नाही.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya