कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले
- by
- Aug 05, 2021
- 1011 views
पनवेल : खारघरमधील कोपरा खाडीत रेल्वे पुलाजवळ अवैधरित्या वाळू उपसा करणार्यांवर पनवेल महसूल विभागाने कारवाई केली आहे. खारघरमधील कोपरा खाडीत अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याबाबतच्या तक्रारीनुसार पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे बेकायदेशीर वाळू उत्खनन करणार्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
पनवेल महसूल विभागाने अवैध वाळू उत्खनन करणार्यांवर धडक कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे. मागील महिन्यात देखील पनवेलमधील रोडपाली व वाघिवली येथे अवैधरित्या वाळू उपसा करणार्यांवर तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली होती. अनधिकृत रेती उत्खनन होत असून त्यामुळे रेल्वे पुलाला धोका निर्माण होत असल्याची माहिती तहसीलदार विजय तळेकर यांना मिळाली. त्याअनुषंगाने मंडळ अधिकारी संतोष कचरे, एल. आर. राऊळ, मनीष जोशी, तलाठी सज्जा अंकिता लोखंडे, संजय बिक्कड यांनी खारघर येथील कोपरा खाडी रेल्वे पुलाजवळ खारघर पोलिसांच्या साथीने धाड टाकली.
पथकाने केलेल्या पाहणीत अनधिकृतपणे सक्शन पंपाच्या साहाय्याने रेती उत्खनन करून तीन कोंड्यात भरून ठेवलेली 7 ते 9 ब्रास रेती आढळून आली. सदर पथकातील अधिकार्यांनी जेसीबीच्या मदतीने कोंड्या उद्ध्वस्त केल्या तसेच कटरच्या साहाय्याने सक्शन पंपचे तुकडे केले. तसेच खाडी मार्गावर जाणारे अंतर्गत रस्ते जेसीबीच्या साहाय्याने चरी खोदून बंद करण्यात आले. कारवाईनंतर अज्ञात व्यक्तीवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya