रा.जि.प. शाळेच्या शिक्षकांचा राज्यस्तरावर सन्मान
ऑनलाईन शिक्षणात पनवेलच्या शिक्षकांचा अनोखा उपक्रम
पनवेल : कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते. शाळाही बंद होत्या, मात्र शिक्षण सुरु राहणे गरजेचे होते. त्यामुळे ऑनलाईन शिक्षक सुरु करण्यात आले. यामध्ये पनवेलच्या रा.जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी सर्व पाठांचे अॅप्लिकेशन बनवून विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरुपी मार्गदर्शनाची सोय केली आहे. त्यांच्या या कौशल्यपुर्ण कामगिरीमुळे राज्यस्तरावर या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील पनवेलमधील रा.जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ूश्रिर्ळींश शर्वीलरींळेपया युट्युब चॅनेलच्या रूपाने सर्व स्तरातील मुलांसाठी लाईव्ह ऑनलाईन पाठाच्या माध्यमातून घरातच मोफत शाळा सुरु केली. यामध्ये इ. 1 ली ते 5 वी पर्यंतच्या वर्गांचा सर्व अभ्यासक्रम ऑनलाईन पूर्ण केला गेला आहे. यामध्ये शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रविवार विशेष भागात ‘गम्मत ेशाळा’ या माध्यमातून जर्मन भाषा, संगणक, रांगोळी, वारली, चित्रकला, कागदकाम, इंग्रजी संभाषण, बुद्धीबळ, रोबोटिक्स अशा विविध कलांचा अभ्यास करण्यासाठी पाठांचे आयोजन केले. तसेच नवरात्री उत्सवात खास महिलांसाठी तंत्रज्ञांन समजावण्यासाठी खास मार्गदर्शन करण्यात आले. या सर्व पाठांचे अप्लिकेशन तयार करून विद्यार्थ्यांसाठी कायम स्वरूपी मार्गदर्शनाची सोय करण्यात आली आहे. या सर्व उपक्रमाचा व सहभागी शिक्षकांचा सन्मान सोहळा शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते औरंगाबाद येथे पार पडला. याप्रसंगी शिक्षण उपसंचालक विशाल सोलंकी, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले हे उपस्थित होते. यामध्ये संपूर्ण राज्यातून जिल्हा परिषदेच्या तंत्रस्नेही शिक्षकांनी उस्फुर्त सहभाग घेतला. नितीन अंतरकर, गजेंद्र बोंबले, रुपाली अंतरकर (औरंगाबाद) यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश देशमाने (सातारा), मुकुंद गायकवाड (पालघर), अमित लांभाते (रायगड) यांनी सहकारी टीम सदस्य म्हणून काम केले. या उपक्रमामध्ये पनवेल मधील जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांनी ऑनलाईन पाठ घेऊन मोलाचे सहकार्य केले. यामध्ये जयश्री मोहिते, चित्ररेखा जाधव, नंदिनी कदम, ज्योती भोपी, रजनी इंगळे, सारिका रघुवंशी, मीना फुलपगारे, अपेक्षा पिंपळे, अक्षता पाटील, साधना पाटील, योगिनी वैदू, शर्मिला उपरे, सीमा गायकवाड, माधवी कोसंबकर, विभावरी सिंगासने, विद्या पाटील, स्मिता म्हात्रे, अमित लांभाते, राजेंद्र चौधरी, मनोज म्हात्रे, वृंदा धामणस्कर, भाग्यश्री केदार, स्मिता सावंत, रेखा गायकवाड, सीमा ससाणे, वंदना साळवी यांनी सहभाग घेतला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya