तोंडरे विभागात एमआयडीसी झोन टाकू नये
नगरसेविका उज्वला पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पनवेल : तोंडरे हद्दीतील सुमारे पन्नास एकर जमिनीवर एमआयडिसी आरक्षण काढून घ्यावा आणि तोंडरे विभागात कोणत्याही जमिनीवर नव्याने एमआयडीसी झोन टाकू नये अशी मागणी तोंडरे येथील नगरसेविका उज्वला विजय पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
तोंडरे गाव व आजूबाजूचा परिसर हा तळोजा औद्योगिक वसाहतीला लागून असून तळोजा औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखाने केमिकल कारखाने असल्याने या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. त्यामुळे तोंडरे गावातील व परिसरातील नागरिकांचे जीवन आरोग्य व स्वास्थ्य पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तोंडरे गावातील लोकसंख्या सुमारे 7 हजार इतकी असून बहुतांशी जमीन एमआयडीसीने संपादित केलेली आहे. भौगोलिक दृष्ट्या विचार करता तोंडरे ग्रामस्थांना प्रदूषणाचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. अनेक दुर्धर आजारांना सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी हवा, पाणी इत्यादी सर्व जीवनावश्यक घटक हे प्रदूषित झाले असल्याने गावातील लोकांचे सरासरी आयुष्यमान येथील घटलेले आहे. अनेक ग्रामस्थांना त्यांच्या उमेदीच्या काळात भयानक रोगाची लागण होत असून त्यांचे जीवनमान संपुष्टात येत आहे. अशा परिस्थितीत लोकांना गावात राहणे अशक्य झाले आहे. लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता ग्रामस्थांना इतर ठिकाणी जाऊन राहणे अशक्य आहे. वरील परिस्थिती पाहता सुमारे पन्नास एकर जागा ही परफॉर्मन्स केमीसर्व प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतलेली असून सर्वे नंबर 84 ते 92 या मिळकतीवर प्रादेशिक पार्क परिमंडळ झोनमध्ये समाविष्ट आहे. हा भूखंड महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ झोन मध्ये समाविष्ट करू नये याबाबत नगरसेविका उज्वला विजय पाटील यांनी हरकत घेतली आहे.
ही जमीन तोंडरे गाव वस्तीपासून सुमारे दोनशे मीटर अंतरावर असल्याकारणाने प्रदूषणामुळे गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होणार आहे. यापूर्वी गावातील बोरवेलचे पाणी प्रदूषित झालेले आहे. एमआयडीसी परिसरामुळे या विभागातील शेती, जनावरे आणि इतर शेतीविषयक व्यवसायांवर देखील घातक परिणाम झालेला दिसून येत आहे. अशा परिस्थितीत गावालगत असणार्या सुमारे 50 एकर जमीन एमआयडीसी वर्गीकरण केले तर त्याचा त्रास या परिसरातील नागरिकांना होणार आहे. त्यामुळे 50 एकर जमिनीवर एमआयडिसी आरक्षण काढून घ्यावा, अन्यथा लोकप्रतिनिधी म्हणून पुढाकार घेऊन जन आंदोलन करावे लागेल असे विजया पाटील यांनी सांगितले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Rajkummar Rao
- जन्मदिन
- August 31
Nagarjuna Akkineni
- जन्मदिन
- August 29
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya