डॉ.प्रितम म्हात्रे सकाळ सन्मान पुरस्काराने सन्मानित
- by
- Feb 01, 2021
- 1066 views
पनवेल : कोरोना काळात सढळ हाताने मदत करुन गरजूंना मदतीचा हात पुढे करणार्या पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते डॉ. प्रितम जनार्दन म्हात्रे यांना त्याच्या या कार्याबद्दल सकाळ सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरविले.
जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने लॉकडाऊन काळात आपल्या जीवाची पर्वा न करता स्वतः प्रितम म्हात्रे यांनी असंख्य गरजूंना मदत केली. या कार्याची दखल घेऊन जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा यथोचित गौरव संस्थेचे अध्यक्ष तसेच पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना सुपूर्द करून सन्मान केला. सन 2020 हे वर्ष कोरोना विषाणू साथीचा आजार, लॉकडाऊन, मास्क व सॅनिटाझरसोबत जगण्याच्या लाईत निघून गेले. कोरोनामुळे अनेक जणांचे आयुष्य विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी नागरिकांना अत्यंत हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या, लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीचे संकट आले, काहींनी तर आपल्या आपल्या राज्यात जाऊन राहणे पसंत केले मात्र अशा महाभयंकर परिस्थितीत देखील काही मनुष्यरूपी देवांचेही दर्शन समाजाला झाले. पनवेल सारख्या महान नगरीत देखील डॉ. प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी कोरोना काळामध्ये असंख्य नागरिकांना मदत केली. म्हात्रे यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना सकाळ सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पनवेलच्या जनतेसाठी निश्चितच हि गर्वाची बाब आहे. प्रितम म्हात्रे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल पनवेलमधील सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya