स्वातंत्र्यातील हुतात्मांच्या स्मृती चिरंतन राहिल्या पाहिजेत,उपसभापती सचिन अहिर
_स्वातंत्र्यातील हुतात्मांच्या स्मृती चिरंतन राहिल्या पाहिजेत,उपसभापती सचिन अहिर
मुंबई-: राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज हुतात्मा दिनानिमित्त स्वातंत्र्य समरात हुतात्मा झालेल्या शूरवीरांना अभिवादन करण्यात आले.सालाबाद प्रमाणे या वर्षिही नानाचौक अग्निशमनदल येथून गिरणी कामगारांची मूक मिरवणूक काढून गवालिया टॅंक मैदाना वरील हुतात्मा स्मारकाला विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर आणि संघटनेचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहण्यात आली.त्यांच्याच नेतृत्वाखाली ही मूक मिरवणूक काढण्यात आली.
त्यावेळी हुतात्म्यांना मानवंदना देताना उपसभापती सचिन अहिर आपल्या भाषणात म्हणाले,१९४२ मध्ये याच मैदानात पार पडलेल्या महाअधिवेशनात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांविरुद्ध चले जावचा ठराव संमत केला. ब्रिटिशांद्वारे त्याविरुद्ध सर्व राष्ट्रभक्तांना अटक करण्यात आली.याविरुद्ध भारतात सर्वत्र संतापाची लाट उसळू आली.स्वातंत्र्याचा लढा सर्वत्र पेटला आणि त्यातून अगस्ट क्रांती दिन जन्माला आला. त्याच्या स्मृती उद्याच्या आदर्श पिढीसाठी कायम राहिल्या पाहिजेत,असेही सचिन अहिर आपल्या भाषणात म्हणाले.या प्रसंगी सरचिटणीस गोविंदराव मोहिते,खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष रघुनाथ अण्णा शिरसेकर,बजरंग चव्हाण,सुनील बोरकर,सेक्रेटरी शिवाजी काळे तसेच महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उपाध्यक्ष राजन लाड,सुनील अहिर, उत्तम गिते,मिलिंद तांबडे आदींनी अभिवादनात भाग घेतला. सेवादलाचे सर्व संघटक आणि सुरेश मोरे, गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे अनंत मोरे आणि अन्य कामगार नेते, महिला फ्रंट आणि विविध विभागांचे प्रमुख या प्रसंगी उपस्थित होते.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने गेली अनेक वर्षे हुतात्मा अभिवादनासाठी, ही गिरणी कामगारांची मूक मिरवणूक प्रथा सूरू आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant