डेंग्यू नियंत्रणासाठी पालिकेच्या उपाययोजना
पनवेल ः 19 जणांना डेंग्यूची लागण झाल्याने महासभेत टीका झाल्यानंतर पालिकेने डेंग्यू, मलेरियाच्या नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. डासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत.
49 विहिरी व तलावांत तसेच खड्डे, नाले, गटारे, दलदल असलेल्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात येणार आहेत. जुन्या टायरमध्ये पाणी साठून त्यात डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता विचारात घेऊन 105 ठिकाणचे जुने टायर हटवण्यात येणार आहेत. पनवेलमधील दोन हजार 202 वसाहती, बंगले, झोपडपट्टयांना नोटीस बजावण्यात येणार आहे, 87 टायरविक्रेते, 31 रोपवाटिका, 68 नारळविक्रेत्यांना आणि 135 बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. डेंग्यू, मलेरिया जनजागृतीसाठी 20 ठिकाणी फलक लावण्यात येत आहेत. तसेच घरोघरी जाऊन सर्वेक्षण आणि पत्रके देऊन जनजागृती करण्यात येत आहे. औषधफवारणी व धूरफवारणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पनवेल महानगरपालिकेने दिली. आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांना डेंग्यूची लागण झाली आहे. धूरफवारणी योग्य रीतीने केली नसल्याचेही आरोप महासभेत करण्यात आले होते.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच धूरफवारणी, नालेसफाई करण्यात आली आहे, महापालिकेला नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. पाणी जास्त दिवस साठवून ठेवू नये. घरात जिथे पाणी साचते त्या जागा वेळेवर स्वच्छ कराव्यात.
- जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Usha uthup
- जन्मदिन
- November 08
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya