श्री स्वामी सिधवासा अपार्टमेंटच्या वतीने रक्तदान शिबिर
पनवेल : राज्यात पुन्हा रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असताना श्री स्वामी सिधवासा अपार्टमेंटच्या वतीने रक्तदान शिबिर रविवार, 20 जून 2021 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजे पर्यंत आयोजित केले होते. हेमंत म्हात्रे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी रक्तदानाचे महत्त्व संागितले. रक्तदान म्हणजे जीवनदान एक रक्तदाता कित्येक जणांचे प्राण वाचवू शकतो म्हणून रक्त दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.
या वेळी स्वामी सिधवासा अपार्ट मेंट मधील अध्यक्ष जयंत पाखरे यांच्या नियोजनातून सेक्रेटरी मोहन पाटील, खजिनदार हेमंत म्हात्रे तसेच सदस्य विजय वाघमारे, अनंत मांडवकर, रामचंद्र मांडवकर यांचा सक्रिय भाग होता. यावेळी देवद गावातील विजय वाघमारे, मोहन पाटील,अनंत मांडवकर यांचे नातेवाईक मित्र मंडळी तरुणानी खूप उत्साहाने रक्तदान केले. रक्त दात्यांचा प्रमाणपत्र व तुळशीचे रोप देऊन सत्कार केला. शेवटी एम जी.एम. हॉस्पिटल येथून आलेल्या सर्व कर्मचार्यांचे तुळशी रोप देऊन अध्यक्ष जयंत पाखरे यांच्या कडून आभार मानण्यात आले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya