माजी आमदार विवेक पाटील यांना अटक
कर्नाळा बँके घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई
पनवेल ः कर्नाळा बँकेच्या 529 कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांना मंगळवारी मुंबई ईडी झोन-2 चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांनी त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली. या गैरव्यवहारात मनीलाँड्रींग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बॅकेच्या 529 कोटीच्या घोटाळ्याला माजी आ. विवेक पाटील यांच्यासह त्यांचे अनेक संचालक मंडळातील सहकारी जबाबदार आहेत. 50 हजार 689 ठेविदारांच्या 529 कोटीच्या ठेवी बँकेत होत्या. बँकेच्या सुरूवातीपासून तत्कालीन शेकाप नेत्यांनी स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठी बँकेतून गैरमार्गाने कोट्यवधी रूपयांच्या ठेवी उचलून बॅकेत गैरव्यवहार केला होता. मात्र, ऑडिट रिपोर्टमध्ये सर्व गैरव्यवहार दडपण्यात आले होते. रिझर्व्ह बँकेला कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या व्यवहारात अनियमितपणा निदर्शनास आल्याने त्यांनी सहकार आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी तातडीने रायगड जिल्हा विशेष लेखा परिक्षक यु. जी. तुपे यांची नियुक्ती करून पूर्नतपासणी केल्यानंतर 63 कर्ज खात्याद्वारे 512 कोटीचा घोटाळा उघड झाला होता. त्यानंतर चौकशीत तो आकडा 529 कोटीवर गेला आहे. या गैरव्यवहारात मनीलाँड्रींग झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
पनवेल संघर्ष समितीने सहकार खाते, गृहखात्याच्या गुप्तवार्ता विशेष गुन्हे शाखा (सीआयडी) आणि ईडीच्या प्रमुखांना भेटून सखोल चौकशी आणि आरोपींच्या अटकेची मागणी करत पाठपुराव्याचा रेटा लावला होता. सीआयडीच्या उपअधिक्षक सरोदे यांच्याकडे तगादा लावल्यानंतर त्यांनी विवेक पाटलांसह, अभिजित पाटील आणि सावंत यांची वाहने जप्त करण्याची कारवाई केली होती. आमदार प्रशांत ठाकुर यांच्यासह आमदार महेश बालदी हे विवेक पाटील यांच्यावर कारवाईसाठी प्रयत्नशील होते. दोन्ही आमदारांनी ठेवीदारांना घेऊन मोर्चे देखील काढले होते. विवेक पाटील यांना अटक करण्यासंदर्भात मुंबई ईडी झोन 2 चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांनी अटक वरंटी काढला होता. या वॉरंटमध्ये मनी लॉन्डरिंगचा ठपका देखील ठेवला असुन मंगळवारी पनवेल येथील राहत्या घरातुन पाटील यांना अटक करण्यात आली. कर्नाळा बँकेचा ईडी स्वतंत्र्यरित्या तपास करणार असल्याने आता कुणाकुणावर अटकेची कारवाई होते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
संचालकांसह 76 जणांविरुद्ध गुन्हा
कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी रायगड जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह संचालक, अधिकारी अशा 76 जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्याआधारे याआधीच सर्वांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya