मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

सोनसाखळी चोरीचे 14 गुन्हे उघडकीस

पनवेल गुन्हे शाखेची कामगिरी

पनवेल ः नवी मुंबई व ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करुन त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना सर्व शाखांना करण्यात आल्या होत्या. यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. गुन्हे शाखा कक्ष 3, पनवेल यांनी कौशल्यपुर्ण तपास करुन अभिलेखावरील अट्टल गुन्हागारास अटक केली आहे. त्याच्याकडून 2 मोटारसायकल हस्तगत करुन 5 लाख रुपये किंमतीच्या मुद्देमाल व 12 सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यासह 14 गुन्हे उघडकीस आणले आहेत. 

नवी मुंबई परिसरात सोनसाखळी चोरीच्या विशेष म्हणजे महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने चोरी करण्याच्या घटना वाढल्या होत्या. गुन्हे शाखा कक्ष 3, पनवेल यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात घडलेल्या सोनसाखळी चोरीचा तपशील संकलीत केला. त्यावरुन चोरी करताना वापरलेल्या वाहनाचा प्रकार, सीसीटीव्ही फुटेज, चोरीचे ठिकाण, चोरीची वेळ व वार, आरोपीचे वर्णन यांवरुन अभ्यासपुर्ण व कौशल्यपुर्ण तांत्रिक तपास करुन सोनसाखळी चोरी करणारा आरोपी गुन्हे अभिलेख तपासून निष्पन्न केला. वेगवेगळी पथके तयार करुन शोधमोहीम सुरु केली. सहा.पो. आयुक्त गुन्हे विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि गणेश कराड, प्रविण फडतरे, पोउपनि वैभव रोंगे व मानसिंग पाटील यांची वेगवेगळी पथके तयार केली. सदर पथकांनी मुंबई, भिंवडी, कल्याण, वर्तकनगर व ठाणे रेल्वे परिसरामध्ये सलग 4 दिवस सापळा लावून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अभिलेखावरील अट्टल गुन्हेगार फजल आयुब कुरेशी, (25), रा, कल्याण याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता सदर गुन्ह्यांची कबूली दिली.

तो सोनसाखळी चोरी करण्याकरिता वापरत असलेल्या 2 मोटारसायकली हस्तगत करुन त्याचेकडून एकूण 5 लाख  रुपये किंमतीच्या मुद्देमालासह नवी मुंबई व ठाणे आयुक्तायातील 12 सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यासह एकूण 14 गुन्हे उघडकीस आणले आहेत. 

  • आरोपीवर यापुर्वी 22 गुन्हे दाखल
  •  सदरचा आरोपी हा 24 एप्रिल 2021 रोजी कोरोना विषाणा प्रादुर्भाव रोखणेकामी न्यायालयाने जामिनावर सोडल्यानंतर आधारवाडी कारागृह ठाणे येथुन बाहेर आल्यावर त्याने सलग एवढे गुन्हे केले आहेत .सदर आरोपी अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर यापुर्वी  चोरी, जबर चोरी, अवैधरित्या शस्त्रे बाळगणे व प्राणी संरक्षण अधिनियम इत्यादी असे मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरामध्ये एकूण 22 गुन्हे दाखल आहेत. 

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट