नोकरीच्या अमिषाने तरुणाला अज्ञात टोळीचा गंडा
57 हजारांची रक्कम उकळून केली फसवणुक
पनवेल ः नोकरी डॉट कॉमच्या माध्यमातून नोकरी शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला अज्ञात टोळीने सुमारे 57 हजारांची रक्कम उकळून त्याची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. पनवेल तालुका पोलिसांनी या टोळी विरोधात फसवणुकिसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.
या प्रकरणात फसवणुक झालेल्या तरुणाचे नाव स्वप्नील बर्वे (22) असे असून तो पनवेरलच्या डेरवली भागात कुटुंबासह रहाण्यास आहे. गत मे महिन्यामध्ये स्वप्नीलने बीटेकची परिक्षा दिल्यानंतर तो क्वालीटी ऑफीसर या नोकरीचा शोध घेण्यासाठी त्याने नोकरी डॉट कॉम या वेबसाईटवर आपली वैयक्तिक माहिती भरली होती. त्यानंतर काही दिवसांमध्येच मनिषा नावाच्या महिलेने नोकरी डॉट कॉम मधुन बोलत असल्याचे सांगून स्वप्नीलच्या मोबाईलवर संपर्क साधला होता. त्यानंतर सदर महिलेने अमुल मिल्क लिमिटेड कंपनीमध्ये क्वालीटी ऑफिसरची व्हॅकेन्सी असल्याचे सांगून त्यासाठी स्वप्नीलला 1550 रुपये रजिस्ट्रेशन फि भरण्यास सांगितले. त्यानुसार स्वप्नीलने रजिस्ट्रेशन फिची रक्कम गुगल पेद्वारे पाठवून दिल्यानंतर अग्निहोत्री नामक व्यक्तीने अमुल मिल्क लि.कंपनीकडून फोनवरुन इंटरव्हूयु घेत असल्याचे भासविले. त्यानंतर दुसर्या दिवशी मनिषाने त्याला फोन करुन त्याची नियुक्ती झाल्याचे सांगून त्याच्या मेडिकल सेक्युरीटीसाठी 8500 रुपये, तसेच कंपनीसोबत बॉन्ड करण्यासाठी 12,500 रुपये स्वप्नीलला भरण्यास सांगितले. त्यामुळे स्वप्नीलने आपल्याला नोकरी नको, सर्व व्यवहार रद्द करण्यास तिला सांगितल्यानंतर मनिषाने सदर व्यवहार रद्द करण्यासाठी 4190 रुपये भरल्यानंतर त्याची संपुर्ण रक्कम त्याला परत मिळेल असे सांगितले. सदर महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून स्वप्नीलने सदरची रक्कम तिच्या खात्यावर पाठविल्यानंतर मनिषाने नेटवर्कच्या अडचणीमुळे सदर रक्कम मिळाले नसल्याचे सांगून त्याला 5589 इतकी रक्कम दुसर्या खात्यावर पाठविण्यास भाग पाडले. त्यानंतर देखील मनिषाने जीएसटी आणि सर्व्हीस टॅक्स अशी वेगवेगळी कारणे सांगुन त्याच्याकडून एकुण 56 हजार 978 रुपये उकळले.
त्यानंतर देखील स्वप्नीलने आणखी 23 हजार रुपयांची रक्कम भरल्यास त्याला कंपनीकडून 1 लाख रुपयांचा चेक दिला जाईल असे सांगण्यात आले. त्यानंतर आपली फसवणुक होत असल्याचे स्वप्नीलच्या लक्षात आल्यानंतर त्यांने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या गुह्यातील आरोपींविरोधात फसवणुकिसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya