पंतप्रधान आवास योजनेतील काम प्रकल्पग्रस्तांना द्या
धाकटा खांदा ग्रामस्थांची मागणी; प्रकल्पावर मोर्चा
पनवेल : पनवेल जवळील धाकटा खांदा गावाजवळ सुरु असलेल्या शासनाच्या पंतप्रधान आवास योजेनेचे सुरु असलेले काम प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावे यासाठी धाकटा खांदा गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सोमवारी त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पावर मोर्चा नेऊन त्याठिकाणी ठिय्या मांडला. यावेळी झालेल्या बैठकीत ग्रामस्थांना सध्या तरी अर्धे काम देण्यात येईल असे आश्वासित करण्यात आले असून उरलेले एस. बी. कंपनीचे काम देखील ग्रामस्थच करतील असे देखील सांगण्यात आले. यावर ठोस निर्णय दोन दिवसात घेण्यात येणार आहे.
धाकटा खांदा गावानजीक पंतप्रधान आवास योजनेच्या इमारती उभारणीचे काम सुरु होत आहे. सदर इमारती सिडकोच्या जागेवर उभारण्यात येणार आहेत. सिडकोने धाकटा खांदा गावातील शेतकर्यांच्या जमिनी कवडी मोल भावाने घेऊन त्यांना त्याचा हवा तास मोबदला देखील अद्याप दिला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांच्या जमिनीवर हे आवास योजनेचे काम सुरु होणार असल्याने सदर कामाचे मुख्य ठेकेदार शापूरजी पलनजी यांच्याकडे हे काम स्थानिक प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यावेळी सदर ठेकेदाराचे प्रतिनिधी ग्रामस्थांना चाल ढकलपणा करून वेळ मारून नेत होते. सदर ठेकेदाराने त्यांना हवे तसे दरपत्रक ग्रामस्थांकडून घेतले पण तरीही त्याला ठेकेदाराने मान्यता न देता लॉकडाऊन लागताच मुंबई येथे परस्पर निविदा काढून मुंबई येथील एस. बी. ट्रान्सपोर्ट कंपनीला काम दिले. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी प्रकल्पाच्या ठिकाणी मोर्चा नेला. त्यावेळी देखील पोलीस पहारा ठेवण्यात आल्याने ठेकेदार पोलिसांना हाताशी धरून चुकीचे काम करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. ठेकेदार चालढकल करत असल्याचे निदर्शनास येत असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी सादर ठिकाणी ठिय्याच मांडला. अखेर पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मध्यस्थी करून कार्यालयात आमदार प्रशांत ठाकूर, ग्रामस्थ आणि ठेकेदाराचे प्रतिनिधी यांच्या बैठक घेतली. या बैठकीत ग्रामस्थांना सध्या तरी अर्धे काम देण्यात येईल असे आश्वासित करण्यात आले असून उरलेले एस. बी. कंपनीचे काम देखील ग्रामस्थच करतील असे देखील सांगण्यात आले. पण यावर ठोस निर्णय दोन दिवसात होणार असून तो निर्णय सकारात्मक न होता ठेकेदाराच्या बाजूने झाला तर मात्र तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक माजी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे यांनी बोलताना दिला. या आंदोलनात स्थानिक नगरसेवक मनोहर म्हात्रे, नगरसेविका हेमलता म्हात्रे, आदींसह सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya