पनवेलमधील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार
पालकमंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश
अलिबाग : पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद राहणार आहेत. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना निर्देश दिले होते, त्यानुसार आयुक्त देशमुख यांनी संबंधित यंत्रणांना आदेश दिले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सध्या आटोक्यात असला तरी दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या दृष्टीने पुढील 4 ते 6 आठवडे खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री तटकरे यांनी आयुक्त यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 23 नोव्हेंबरपासून सुरु होणार्या पनवेल महापालिका क्षेत्रातील शाळा आता 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत.
नियमितपणे ऑनलाईन क्लासेस तसेच अन्य उपक्रम सुरू असणार आहेत. शालेय शिक्षण विभागाकडून 30 ऑक्टोबरनंतर शाळांमध्ये 50 टक्के शिक्षकांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच शिक्षकांनी शाळेत ऑनलाईन शैक्षणिक अभ्यासक्रम, विविध उपक्रम, पर्यायी शिक्षण या सर्व बाबींवर काम करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यांचे पालन करणे संबंधित शाळा प्रशासनावर बंधनकारक असेल. दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणेच सुरु राहतील.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya