पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत
पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत
पालघर -: पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून सखल भाग जलमय झाले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही या पावसाचा मोठा परिणाम झाला असून अनेक लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, धामणी धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आल्याने सूर्या नदीकाठच्या ६५ गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून आजही पावसाचा जोर कायम आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून सखल भाग, रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुसळधार पावसाचा फटका पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीला ही बसला आहे. अनेक लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या उशिराने तर काही मर्यादित स्थानकांपर्यंतच धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
दरम्यान, सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणे आणि नद्यांमधील पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली आहे. सूर्या प्रकल्पातील धामणी धरणाचे पाच दरवाजे ७५ सेंटीमीटरने उघडण्यात आले असून धामणी आणि कवडास धरणातून एकूण ३७ हजार ३०३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीपात्रात सुरू आहे. या विसर्गामुळे सूर्या नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून नदीकाठच्या ६५ गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. धामणी धरणातील पाणीसाठा ९३ टक्क्यांवर पोहोचला असून उपधरण असलेले कवडास धरण ओव्हरफ्लो झालं आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर