Cadila फार्मावर FDA ची कारवाई – बंदी असलेली 2.45 कोटींची औषधे जप्त
Cadila फार्मावर FDA ची कारवाई – बंदी असलेली 2.45 कोटींची औषधे जप्त
मुंबई-: महाराष्ट्र FDA ने कॅडिला Cadila फार्माच्या ‘ॲसिलोक’ ACILOC ब्रँडच्या औषध विक्रीवर बंदी घालत सुमारे २. ४५ कोटी रुपयांचा साठा जप्त केला आहे. औषधांच्या नावांमध्ये असलेल्या कमालीच्या साधर्म्यामुळे रुग्णांना चुकीचे औषध मिळण्याचा धोका निर्माण झाल्याने ही कारवाई करण्यात आली. State& Local Government
अधिकृत माहितीनुसार, कॅडिला कंपनीच्या ॲसिलोक १५०, ॲसिलोक १५० प्लस, ॲसिलोक ३०० आणि ॲसिलोक ३०० प्लस या औषधांवर ही बंदी आणण्यात आली आहे. सर्वसामान्यांमध्ये अल्सर, छातीत होणारी जळजळ आणि ॲसिडिटी यांसारख्या आजारांवर अत्यंत लोकप्रिय असलेल्या या औषधांमध्ये रॅनिटिडिन, आणि फॅमोटिडिन हे दोन मुख्य सक्रिय औषधी घटक समाविष्ट आहेत. एकाच नावाशी साधर्म्य असणारी औषधे बाजारात आणल्याने डॉक्टर, औषध विक्रेते आणि थेट ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन आरोग्याचा मोठा अनर्थ ओळढू शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे.
FDA ने म्हटले आहे की, कॅडिला कंपनीला सुरुवातीला केवळ रॅनिटिडिन घटकावर आधारित ॲसिलोक १५० आणि ॲसिलोक ३०० या औषधांच्या उत्पादनाची रीतसर मंजुरी देण्यात आली होती. मात्र, कंपनीने अधिकृत परवानग्यांचा गैरफायदा घेत, स्वतःच्या अधिकारात फॅमोटिडिन हा वेगळा घटक असणारी ॲसिलोक १५० प्लस आणि ॲसिलोक ३०० प्लस ही औषधे जवळपास एकसारख्याच दिसणाऱ्या वेष्टनात बाजारात आणली. औषधांचे मूळ सूत्र बदलूनही मूळ नावाचाच वापर करणे हा औषध नियंत्रण कायद्याचा स्पष्ट भंग आहे,
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant