‘आमचा वेळ वाया घालवू नका’, विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईवर सुनावणीस SC चा नकार
‘आमचा वेळ वाया घालवू नका’, विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईवर सुनावणीस SC चा नकार
नवी दिल्ली-: कॉकरोच जनता पक्षाने 20 जुलै रोजी संसद मार्च काढला होता. यावेळी हजारो आंदोलक संसदेच्या दिशेने पुढे सरसावले होते, त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यात 100 हून अधिक पोलीस कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना दुखापती झाल्या होत्या. या घटनेची दखल घ्यायला वेळ नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, ‘आम्हाला व्हिडिओ पाहण्यात कोणतीही रुची नाही. आमच्याकडे ते पाहण्यासाठी वेळ नाही. आम्हाला व्हिडिओ पाहायचे नाहीत.’ जेव्हा वकिलांनी पुन्हा विद्यार्थ्यांवरील मारहाण आणि व्हिडिओचा उल्लेख केला, तेव्हा सरन्यायाधीश म्हणाले, ‘आमचा वेळ वाया घालवू नका.’ हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालया समोरही मांडण्यात आले तेव्हा दिल्ली उच्च न्यायालयानेही अशाच याचिकेवर तातडीच्या सुनावणीस नकार दिला होता. कोर्टाला यात ओढू नका, असे म्हटले होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर