पोलीसांनी ताब्यात घेऊनही वांगचूक यांचा उपोषणाचा निर्धार कायम
पोलीसांनी ताब्यात घेऊनही वांगचूक यांचा उपोषणाचा निर्धार कायम
नवी दिल्ली-: नीट पेपरफुटीच्या विरोधात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी आंदोलन करणारे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांना पोलिसांनी जबरदस्तीने उचलून रुग्णालयात दाखल केलं आहे. नवी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात वांगचुक यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. मात्र, वांगचुक यांनी रुग्णालयात औषधे आणि सलाईन घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
सफदरजंग रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. सोनम वांगचुक यांनी डिहायड्रेशन म्हणजेच शरीरातील पाण्याची कमतरता आहे. तसेच चयापचय विकारांची लक्षणे दिसत आहेत. अशातच त्यांनी रुग्णालयात औषधे आणि सलाईन घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. वांगचुक यांच्यावर सतत देखरेख ठेवली जात असून त्यांना उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पर्यावरणशास्त्रज्ञ सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांना दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर (Jantar Mantar) येथील आंदोलनस्थळावरून हटवून रुग्णालयात (Hospital) दाखल केल्यानंतर या कारवाईवर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांवर या प्रकरणावरुन जोरदार टीका होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, सोनम वांगचुक यांना रुग्णालयात भरती केल्यानंतर जंतर मंतर या ठिकाणी अभिजीत दिपके यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. जंतर मंतरवर मोठी गर्दी असल्याचं पाहायला मिळत आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant