72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर
72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली-: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली. 2024 या वर्षात सेन्सॉर प्रमाणपत्र (CBFC) मिळालेल्या चित्रपटांमधून विविध भाषांतील उत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि माहितीपटांचा गौरव करण्यात आला. सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक (Best Film Critic) हा पुरस्कार संजीव श्रीवास्तव यांना प्रदान करण्यात आला. मराठीतील ‘हमसफर’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट (Best Short Film) पुरस्कार जाहीर झाला. मराठी चित्रपट ‘ऑन द ट्रेल ४१ डिग्री’साठी शिवपाल सिंह कांग यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन पुरस्कार जाहीर झाला.
हिंदी-काश्मिरी लघुपट ‘ओबूर (Obur)’साठी फराज अली यांना सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार मिळाला. ‘लिटल प्लॅनेट – ए टेल ऑफ फ्रॉग्स’ या इंग्रजी चित्रपटासाठी सौंदर्य चयचंद्रन यांना सर्वोत्कृष्ट निवेदक (Narrator/Voice Over) पुरस्कार मिळाला.
नॉन-फीचर फिल्म्स विभागात हिंदीतील ‘राम-नामी’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट (Best Documentary) पुरस्कार मिळाला.
कला आणि संस्कृतीवरील सर्वोत्तम चित्रपट म्हणून हिंदीतील ‘मैं निदा’ या चित्रपटाची निवड करण्यात आली.
सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्तम नॉन-फीचर चित्रपट हा पुरस्कार हिंदी, राजस्थानी आणि इंग्रजी भाषांतील ‘पिपलांतरी – ए टेल ऑफ इको फेमिनिझम’ या चित्रपटाला जाहीर झाला.
सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन फिल्म म्हणून जेबी प्रॉडक्शन्स निर्मित आणि जोशी बेनेडिक्ट दिग्दर्शित ‘टच्ड अॅज वॉटर’ (सायलेंट) या चित्रपटाचा गौरव करण्यात आला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर