ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षींचे निधन
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षींचे निधन
पुणे-: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते, लेखक डॉ. कुमार सप्तर्षी (८५ ) यांचे आज पुण्यात निधन झाले. सप्तर्षी यांनी आपल्या आयुष्यभर समाजवादी विचारसरणीचा पुरस्कार केला. त्यांच्या निधनाने राज्याच्या सामाजिक, राजकीय आणि गांधीवादी चळवळीतील एक महत्त्वाचा आवाज हरपल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. सोमवारी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कोथरुडमधील गांधी भवन इथं ठेवलं जाईल, त्यानंतर अंत्यसंस्कार होतील, अशी देखील माहिती संबंधितांनी दिली.
युवकांना संघटित करून सामाजिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘युवक क्रांती दल’ (युक्रांद) या संघटनेची स्थापना केली होती. युक्रांदच्या माध्यमातून त्यांनी हजारो तरुणांना सामाजिक भान, लोकशाही मूल्ये आणि परिवर्तनवादी विचारांची प्रेरणा दिली.
सप्तर्षी यांनी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून गांधीवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी सातत्याने कार्य केले. समाजकारण, शिक्षण, ग्रामीण विकास आणि लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. १९७८ मध्ये ते अहमदनगरमधून आमदार म्हणून निवडून आले होते. १९६७ मध्ये युवक क्रांती दलाची स्थापना, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्षपद तसेच ‘सत्याग्रही’ मासिकाचे दीर्घकाळ संपादन ही त्यांच्या सार्वजनिक जीवनातील उल्लेखनीय कामगिरी मानली जाते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade