PMRDA क्षेत्रातही UDCPR लागू करण्याचे शासनाचे निर्देश
PMRDA क्षेत्रातही UDCPR लागू करण्याचे शासनाचे निर्देश
मुंबई – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) क्षेत्रात एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) लागू करण्याबाबत राज्य शासनाने अधिकृत शासन निर्देश जारी केले आहेत. या निर्णयामुळे PMRDA कार्यक्षेत्रातील विकास प्रक्रिया अधिक एकसमान, पारदर्शक आणि सुसंगत होणार असून नागरिक, विकासक, गुंतवणूकदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शासनाने जारी केलेल्या निर्देशांनुसार, PMRDA क्षेत्रातील विकासासाठी यापुढे UDCPR मधील तरतुदी लागू राहतील, ज्यामुळे राज्यातील इतर नियोजन प्राधिकरणांप्रमाणेच एकसंध विकास नियंत्रण व्यवस्था निर्माण होईल. हा निर्णय PMRDA च्या विनंती, व्यापक जनहित आणि नियोजनातील सुसंगतता लक्षात घेऊन घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे:
PMRDA क्षेत्रात व लगातच्या महानगरपालिका क्षेत्रात विकास नियमांमध्ये एकसमानता येणार.
बांधकाम परवानग्यांची प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक होणार.
विकास प्रकल्पांना गती मिळणार.
नागरिक आणि विकासकांमधील नियमांबाबतचा संभ्रम दूर होणार.
पुणे महानगर प्रदेशाच्या नियोजित आणि शाश्वत विकासाला चालना मिळणार आहे.
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर