आषाढी वारीत प्रथमच वापरली जाणार ‘BBPDR’टेक्नॉलॉजी
आषाढी वारीत प्रथमच वापरली जाणार ‘BBPDR’टेक्नॉलॉजी
पुणे- : आषाढी वारीत भाविकांना उत्तम सेवा-सुविधा पुरवण्यासाठी आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक बळकट करण्यासाठी यंदा प्रथमच ‘बीबीपीडीआर’ (Broadband Public Disaster Response) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. संपूर्ण देशात पहिल्यांदाच या कम्युनिटी सिस्टीमच्या नवीन तंत्रज्ञानाचा प्रयोग पंढरपूर वारीतून होत असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली आहे.
यंदाच्या आषाढी वारीमध्ये पंढरपुरात किमान 30 ते 32 लाख भाविक विठ्ठल दर्शनासाठी येण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी जमल्यास मोबाईल नेटवर्क पूर्णपणे जॅम होते, ज्यामुळे पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये संपर्क साधणे कठीण होते. हीच समस्या लक्षात घेऊन सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ही ‘बीबीपीडीआर’ प्रणाली पुढे आली आहे.
पंढरपूरच्या वारीत राबवला जाणारा हा ‘बीबीपीडीआर’ सिस्टीमचा प्रयोग यशस्वी ठरल्यास, या आधुनिक दळणवळण प्रणालीचा वापर नाशिकच्या कुंभमेळ्यातही गर्दी आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी होऊ शकतो.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर