तामिळनाडूतील गोहत्येवरील बंदीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
तामिळनाडूतील गोहत्येवरील बंदीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
चेन्नई-: तामिळनाडूमध्ये गोहत्येवर बंदी घालणाऱ्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.१३) रोजी स्थगिती दिली आहे. राज्य सरकारने या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या नियमांचा हवाला देत सांगितले की दहा वर्षांहून अधिक वयाच्या गोवंशाच्या हत्येवर कायदेशीर बंदी नाही. उच्च न्यायालयाने याविरोधात जाऊन हा आदेश जारी केला आहे असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहे. ‘बार एंड बेंच’च्या रिपोर्टनुसार न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठाने तामिळनाडू सरकारच्या अपिलावर सुनावणी करताना राज्य सरकारच्या याचिकेवर नोटिक जारी केली आणि पुढील सुनावणी पर्यंत हायकोर्टाच्या आदेशावर स्थगिती देण्याचा आदेश दिला आहे.
मद्रास उच्च न्यायालयाने २७ मे रोजी आपल्या आदेशात घटनेच्या कलम ४८ आणि १९७६ मध्ये तामिळनाडू सरकारने जारी केलेल्या गोहत्या निषेध संबंधी आदेशाचा हवाला देत राज्य सरकारला निर्देश दिले होते की बकरी ईदसह कोणत्याही दिवशी गाय आणि वासरांची बळी दिला जाऊ नये.
तामिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद करताना मुळ याचिका केवळ बकरी ईदच्या अवैध कत्तलखान्याच्या बाहेर गायी आणि वासरांच्या कथित बळीच्या मुद्यांपर्यंत मर्यादित होती, असे म्हटले आहे. सरकारचे म्हणणे होते की मद्रास हायकोर्ट खंडपीठाने या प्रकरणात पुढे जाऊन संपूर्ण राज्यात गायींच्या हत्येवर संपूर्ण बंदी घालण्याचे निर्देश दिले होते. जे याचिकेच्या कक्षेबाहेर आणि कायदेशीर नाहीत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade