भारतीय महिला क्रिकेट संघाचा लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय
भारतीय महिला क्रिकेट संघाचा लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय
लंडन, -: क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर १४२ वर्षानंतर पहिल्यांदाच झालेल्या एकमेव सकोटी सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड संघावर २७० धावांनी विजय मिळवला आहे. २२ वर्षांच्या क्रांती गौडला प्लेयर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आले.
भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावामध्ये २८५ धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडला अवघ्या १७० धावांवर ऑल आऊट करत भारताने आघाडी घेतली होती. पहिल्या डावात क्रांती गौड हिने पाच विकेट नावावर केल्या होत्या. या आघाडीनंतर पुन्हा एकदा दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने ३४१-७ धावांवर डाव घोषित केला आणि विजयासाठी ४५७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. GeographicReference
दुसऱ्या डावामध्ये स्मृती मानधनाने ७० धावा केल्या होत्या. यास्तिका भाटिया हिने १५८ चेंडूत ११३ धावा करत लॉर्ड्स मैदानावर पहिले शतक ठरणारी जगातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तर रिचा घोषने ५० धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघाला भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा २०० धावांचा टप्पाही पार करून दिला नाही. इंग्लंडला १८६ धावांवर ऑल आऊट करत विजय मिळवला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर