24 गावातील गावठाण क्षेत्राचे होणार भूमापन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील 24 महसुली गावांमध्ये गावठाण क्षेत्राची मोजणी करणे व भूमापन क्रमांक देऊन भूखंडाचा नकाशा व मालकी हक्क दस्तावेज तयार करण्यास शासनाने मान्यता दिली असून त्यासंदर्भातील अध्यादेश शासनाकडून शुक्रवारी (दि. 01 जानेवारी ) काढण्यात आले आहेत. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागणी व पाठपुरावा केला होता.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील समाविष्ट गावातील गावठाण क्षेत्राचे नगर भूमापन करण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेच्या स्थापनेपासून शासनाकडे केलेल्या मागणीत म्हंटले होते कि, 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 30 महसूली गावातील गावठाण क्षेत्राचे सर्वेक्षण करून त्याचे नकाशे तयार करणे व जनतेस अधिकार अभिलेख प्रदान करणेच्या कामाबाबत महानगरपालिकेने संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांचेशी संपर्क साधला होता. या कामाचे स्वरूप, त्यासाठी आवश्यक कर्मचारी वृंद व खर्चाचे अंदाजपत्रक याबाबतचा सविस्तर अहवाल संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांनी 30 जानेवारी 2019 रोजी महसूल विभागास सादर केला आहे. या मोजणी कामासाठी 1 कोटी 90 लाख 50 हजार 235 रुपये प्रस्तावित खर्चाची तरतूद देखील महानगरपालिकेने केली आहे. महानगरपालिका स्थापनेनंतर पालिका हद्दीत समाविष्ट गावांचा व गावठाणाचा विकास योजना आराखडा तयार करणेचे काम सुरू आहे. समाविष्ट झालेल्या महसूली गावांच्या गावठाणातील घरे जुन्या पध्दतीची असून त्यांचे आयुर्मान कमी आहे. अशा घरांच्या पुनर्बांधणी बाबत आपल्याकडून अर्ज प्राप्त होत आहेत. तथापि, पुरेशा कागदपत्रे अभावी पुनर्बांधणी परवानगी देणे महापालिका प्रशासनास अडचणीचे झाले आहे. तसेच मोडकळीस आलेली घरे कोसळून जीवितहानी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे महानगरपालिकेची सर्वेक्षणाची मागणी योग्य असून ती युध्द पातळीवर पूर्ण करण्याची गरज असल्याचे आ. प्रशांत ठाकूर यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच निधीची उपलब्ध करूनही, महसूल खात्याकडून या बाबींवर गांभीयनि लक्ष पुरविले जात नसल्याचे दिसून येत असल्याने सुमारे दोन वर्षाचा कालावधी उलटूनही सर्वेक्षणाचे कामास महसूल विभागाकडून मंजूरी दिली जात नाही ही खेदाची बाब आहे, असे नमूद करून पनवेल महानगरपालिका हद्दीतील महसूल गावांच्या गावठाणाचे सर्वेक्षण सुरू करण्याचे दृष्टीने आवश्यक कारवाई तातडीने करावी व तशा सूचना संबधितांना द्यावेत, अशी आग्रही मागणी केली होती.
त्यानुसार पनवेल महानगरपालिका हद्दीतील देवीचापाडा, चाळ, घोट, कळंबोली, रोडपाली, पडघे, पालेखुर्द, ढोंगर्याचापाडा, टेंभोडे, बिड, आडिवली, रोहींजण, नागझरी, तळोजे मजकूर, खिडूकपाडा, वळवली, आसुडगाव, धानसर, धरणागाव धरणाकॅम्प, पिसार्वे, तुर्भे, करवले व कोयनावेळे या महसुली गावांमध्ये गावठाण क्षेत्राची मोजणी करणे व नगर भूमापन क्रमांक देऊन भूखंडाचा नकाशा आणि मालकी हक्क दस्तावेज तयार करण्यात शासन मान्यता देण्यात आली आहे. यामुळे या परिसरातील रहिवाशांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya