PUC नियमांत होणार मोठा बदल
PUC नियमांत होणार मोठा बदल
मुंबई-: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) जारी केलेल्या एका नवीन मसुद्यानुसार, वाहनांच्या वयानुसार PUC चाचणीचा कालावधी ठरवणे विचाराधीन आहे. या नव्या प्रस्तावामुळे नवीन वाहनधारकांना दरवर्षी चाचणी केंद्रांवरील हेलपाटे वाचतील. भारत स्टेज (BS) हे वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुराचे व प्रदूषणाचे प्रमाण मोजण्याचे एक राष्ट्रीय मानक आहे. इंजिनातून बाहेर पडणारे कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साईड्स आणि सूक्ष्म धूलिकण यांवर मर्यादा घालण्याचे काम हे नियम करतात.
नव्या प्रस्तावानुसार सरकारने आधुनिक आणि कमी प्रदूषण करणाऱ्या बीएस-६ वाहनांना विशेष दिलासा देण्याचे ठरवले आहे. वाहनाच्या वयानुसार या नियमांची वर्गवारी करण्यात आली आहे.६ वर्षांपर्यंतची नवीन वाहने
ज्या बीएस-६ वाहनांचे वय ६ वर्षांपेक्षा कमी आहे, त्यांना आता दरवर्षी पीयूसी काढण्याची गरज भासणार नाही. एकदा पीयूसी काढल्यानंतर ते ३ वर्षांसाठी वैध राहील.
६ ते १० वर्षे जुनी वाहने
तसेच, या गटातील वाहनांना सध्याच्या नियमानुसार दरवर्षी आपले पीयूसी नूतनीकरण करावे लागेल.
१० वर्षांपेक्षा जास्त जुनी वाहने
१० वर्षांहून अधिक कालावधी पूर्ण केलेल्या बीएस-६ वाहनांसाठी दर ६ महिन्यांनी प्रदूषण चाचणी करणे अनिवार्य असेल.
जुन्या वाहनांवर कडक नजर
नवी वाहने कमी धूर सोडतात, त्यामुळे त्यांना सवलत देण्यात आली असली, तरी जुन्या वाहनांवर मात्र सरकारने कडक धोरण अवलंबले आहे.
BS-4 वाहने
BS-4 श्रेणीतील सर्व गाड्यांना दर ६ महिन्यांनी पीयूसी चाचणी करावी लागेल.
बीएस-१, बीएस-२ आणि बीएस-३ वाहने
तसेच, अधिक प्रदूषण करणाऱ्या अत्यंत जुन्या गाड्यांसाठी दर ३ महिन्यांनी पीयूसी नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant