कपिल सिब्बल CJP बाजूने मैदानात, कायदेशीर मदतीची हमी देत दिली 1 कोटी देणगी
कपिल सिब्बल CJP बाजूने मैदानात, कायदेशीर मदतीची हमी देत दिली 1 कोटी देणगी
नवी दिल्ली-: शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतरमंतरवरील CJP चे आंदोलन संपले आहे. मात्र आंदोलनात सामील विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करू होऊ नये या सरकारने मान्य केलेल्या मागणीवर आता CJP कडून पाठपुरावा सुरू आहे. यामध्ये अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल आता विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी CJP ला पाठींबा देत कायदेशीर मदत देण्याची घोषणा केली आहे.
वकील कपिल सिब्बल यांनी आंदोलनातील प्रमुख अभिजीत दीपके आणि सौरव दास यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत महत्त्वाची भूमिका मांडली. कपिल सिब्बल यांनी शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होऊ नये, अशी मागणी केली. आंदोलनादरम्यान किंवा त्यानंतर देशातील कोणत्याही राज्यात विद्यार्थ्यांवर FIR दाखल झाल्यास त्यांना कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. यासाठी देशभरातील वकिलांना एका संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहनही करण्यात येणार आहे.
यावेळी कपिल सिब्बल यांनी सर्वात मोठी घोषणा करत, विद्यार्थी आंदोलनासाठी कायदेशीर मदतीसाठी स्वतः 1 कोटी रुपये देणार असल्याचे सांगितले. हा निधी केवळ लीगल हेल्पसाठी वापरला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच इतरांनीही या उपक्रमाला आर्थिक मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. यावेळी सौरव दास यानेही सांगितले की, सरकारच्या आश्वासनांवर आम्ही आंदोलन थांबवलं आहे. जर आश्वासनं पूर्ण झाली नाही तर आम्हाला पुन्हा निर्णय घ्यावा लागेल.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर