१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्ह स्पर्धेची घोषणा
१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्ह स्पर्धेची घोषणा
पुणे -: पुण्याच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि साहित्यिक परंपरेचा गौरव वाढविणारे १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जानेवारी २०२७ मध्ये पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. या ऐतिहासिक शताब्दी संमेलनासाठी अधिकृत बोधचिन्ह (Logo) निवडण्यासाठी राष्ट्रीय खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, ही माहिती आयोजक समितीने पत्रकार परिषदेत दिली.
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बोधचिन्हास ₹५१,०००/- (एक्कावन्न हजार रुपये) रोख, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
पुणे हे विद्येचे माहेरघर, इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेले शहर आणि आधुनिकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे बोधचिन्हामध्ये पुण्याचा ऐतिहासिक वारसा, मराठी साहित्याची समृद्ध परंपरा, महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि आधुनिकतेचा वेध यांचा सुरेख संगम अपेक्षित आहे. तसेच संमेलनाचे शताब्दी वर्ष (१०० वे वर्ष) डिझाइनमधून ठळकपणे प्रतिबिंबित होणे आवश्यक आहे.
स्पर्धकांसाठी महत्त्वाच्या सूचना
• ही स्पर्धा भारतातील सर्व कलाकार, डिझायनर्स, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी खुली आहे.
• बोधचिन्ह JPG/JPEG (300 DPI) व Vector PDF या स्वरूपात पाठविणे अनिवार्य आहे.
• प्रविष्टीसोबत १०० ते १५० शब्दांचे मराठी भाषेतील संकल्पना स्पष्टीकरण जोडणे आवश्यक आहे.
• सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
• प्रविष्टी पाठविण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२६ आहे.
अधिक माहितीसाठी तसेच प्रविष्टी पाठविण्यासाठी shatabdilogo@sahityaparishad.org येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
१०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
बोधचिन्ह (Logo) स्पर्धा
बोधचिन्ह स्पर्धा : नियम व अटी
आयोजक : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
संयोजक : समर्थ युवा फौंडेशन
सहसंयोजक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे
(१०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पुणे – जानेवारी २०२७)
विषय
१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रीय बोधचिन्ह (Logo) स्पर्धा
सर्वोत्कृष्ट बोधचिन्हासाठी पारितोषिक
???? ₹५१,०००/- (एक्कावन्न हजार रुपये) रोख व सन्मानचिन्ह
???? स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्पर्धेचे स्वरूप व निकष
१. पात्रता
ही स्पर्धा भारतातील सर्व नागरिक, कलाकार, विद्यार्थी, व्यावसायिक डिझायनर्स तसेच भारतीय नागरिकांसाठी खुली आहे.
२. संकल्पना (Theme)
बोधचिन्हामध्ये पुढील घटकांचा समतोल व प्रभावी संगम असावा –
• पुणे शहराचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा
• मराठी साहित्याची समृद्ध परंपरा आणि अभिजात मराठी भाषेची वैश्विक ओळख
• महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख
• आधुनिकता व भविष्याचा वेध
• संमेलनाचे “१०० वे वर्ष” (शताब्दी) ठळकपणे प्रतिबिंबित झालेले असावे.
३. तांत्रिक तपशील (Technical Specifications)
• फॉर्मेट :
o JPG/JPEG (किमान 300 DPI)
o Vector PDF (अनिवार्य)
• रंगसंगती :
बोधचिन्ह रंगीत (Colour) असावे. तसेच कृष्णधवल (Black & White) स्वरूपात किंवा लहान आकारात (Micro Scale) वापरल्यासही ते स्पष्ट, आकर्षक व प्रभावी दिसेल, याची काळजी घ्यावी.
४. मूळ संकल्पना (Originality)
बोधचिन्ह पूर्णपणे मूळ (Original) असणे आवश्यक आहे. ते कोणत्याही विद्यमान डिझाइनची प्रत किंवा कॉपीराइटचे उल्लंघन करणारे नसावे.
AI च्या साहाय्याने तयार केलेल्या डिझाइनपेक्षा सर्जनशीलता, नावीन्य आणि मूळ कल्पनेला प्राधान्य दिले जाईल.
५. संकल्पना स्पष्टीकरण
बोधचिन्हासोबत १०० ते १५० शब्दांतील मराठी भाषेतील संक्षिप्त संकल्पना (Concept Note) जोडणे अनिवार्य आहे.
इतर अटी व शर्ती
हक्क
निवड झालेल्या बोधचिन्हाचे सर्वाधिकार (Copyright) १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजक समितीकडे राखीव राहतील.
अंतिम निर्णय
परीक्षक मंडळ व आयोजक समितीचा निर्णय अंतिम असून तो सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील.
प्रविष्टी पाठविण्याची पद्धत
स्पर्धकांनी खालील माहिती नमूद करून आपली प्रविष्टी पाठवावी.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade