राज्यातील SIR ला 8 दिवसांची मुदतवाढ
राज्यातील SIR ला 8 दिवसांची मुदतवाढ
मुंबई-: राज्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. राज्यात SIR प्रक्रियेला 8 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. पाऊस आणि इतर बाबींमुळे SIR प्रक्रियेला वेळ वाढवून द्यावा अशी अनेक पक्षांनी मागणी केली होती. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने 8 दिवसाचा कालावधी वाढवून दिला आहे.
राज्यातील एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती. ही प्रक्रिया अधिक क्लिष्ट असल्याने त्यासाठी एक महिन्याची मुदत अपुरी असल्याचे विधान परिषद सदस्य सतेज पाटील यांनी म्हटले होते. तर संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात भारतीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून सहा महिन्यांपर्यंत मुदत वाढ देण्याची विनंती करण्यात येईल असे सांगितले.
Special Intensive Revision म्हणजेच SIR.. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, मतदार यादी दुरुस्ती करणे. पण याची प्रक्रिया जरा वेगळी असते. SIR मध्ये प्रत्येक घरात जाऊन विचारपूस करून डिप्लिकेट मतदार वगळ्यात येतात आणि नवीन मतदार यादीमध्ये अॅड केले जाते. अनेक लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहायला जातात किंवा काही वेळा मतदार यादीत चुकीची नावे तशीच राहतात. हीच दुरुस्ती करण्यासाठी SIR दरम्यान बीएलओ (BLO – बूथ लेव्हल ऑफिसर) घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची खातरजमा करतात.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant