तेलानी मेरीटाईम इंस्टिट्युटवर युवासेनेची धडक…
तेलानी मेरीटाईम इंस्टिट्युटवर युवासेनेची धडक…
मुंबई - पुणे जिल्हा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे नुकताच घडलेल्या दुर्दैवी अपघातात २० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
तेलानी मेरीटाईम इंस्टिट्युट च्या आवारात बास्केटबॉल खेळताना पोस्ट कोसळून ही घटना घडली. ह्या घटनेची त्वरित दखल घेऊन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व वरून सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाने माझ्या नेतृत्वाखाली युवासेनेने संबंधित इंस्टिट्युटवर धडक देऊन त्यांस धारेवर धरले.व इंस्टिट्युटच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याच्या झालेल्या जीवितहानी संदर्भात जाब विचारला. त्यात इंस्टिट्युटने शासनाने दिलेल्या नियम व अटीचे पालन न केल्याचा ठपका ठेवण्यात आला. व त्या संदर्भात लेखी निवेदन देण्यात आले त्यात प्रामुख्याने बास्केटबॉल स्टॅन्डची सुव्यवस्था तपासणी (मेंटेनन्स) का करण्यात आली नव्हती.
खेळाडू संदर्भात आपत्कालीन परिस्थितीतील वैद्यकीय सेवेचा अभाव होता. तसेच कॉलेज कॅम्पसच्या मैदानात नियमानुसार सी. सी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नाही. सदरच्या घटनेचे फुटेज उपलब्ध नाही . अशा अनेक महत्त्वाच्या विषयावर कॉलेज प्रशासनास धारेवर घरले.
कॉलेज प्रशासनाने देखील घडलेल्या प्रसंगावर दुःख व दिलगीर व्यत्त करत अशा घटना भविष्यात पुन्हा होऊ देणार नाही. तसेच मृत विध्यार्थीच्या परिवारास सर्वोत्परी सहकार्य करून पोलिसांमार्फत होणाऱ्या तपासात (चौकशीस) पारदर्शकपणे सहकार्य करण्याचे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासन्याच्या चुका निदर्शनास आणल्या त्यांना कॉलेज प्रशासनाकडून कोणत्याही पद्धतीने दबाव अथवा त्रास देण्यात येणार नाही आश्वासित केले.
सदरची घटना कॉलेज प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घडली असून त्यास दुघृटनेच्या दिशेने तपास न करता कालेज प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन वरीष्ठ पोलीस आधिकारी यास युवासेने तर्फे देण्यात आले.
पोलीसांनी देखील सखोल चौकशी करून मृत विद्यार्थ्यांच्या पालकांस न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी युवासेना महाराष्ट्र वितरक नीलेश बडदे, शिवसेना जिल्हा प्रमुख – गौतम चाबुकस्वार, शहर प्रमुख – राजेंद्र मोरे, तालुका प्रमुख – आशिष ठोमरे, महिला संघटिका – शैला ताई खंडागळे,युवासेना उपशहर प्रमुख – निखिल दळवी, प्रसाद जठार, तालुका प्रमुख – उमेश गावडे, रवींद्र बावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade