उखडलेल्या पेव्हर ब्लॉकमुळे पादचारी त्रस्त
उखडलेल्या पेव्हर ब्लॉकमुळे पादचारी त्रस्त
मुंबई, -सीएसटी येथील रेल्वे मुख्यालयासमोर पदपथावरील पेव्हर ब्लॉक उखडल्यामुळे पादचारी आणि नागरिक पाय अडकून पडत आहेत. या पदपथावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये – जा सुरु असते. तसेच या परिसरात या परिसरात मोठ्या प्रमाणात सरकारी आणि खाजगी कंपन्यांची कार्यालये असल्यामुळे या पदपथावरून रोज हजारो चाकरमानी ये – जा करत असतात. तसेच महापालिका मुख्य कार्यालय देखील याच मार्गावर पुढे असल्यामुळे महापालिकेचे कर्मचारी देखील याच पदपथावरून ये-जा करत असतात. परंतु गेल्या काही दिवसापासून या पदपथावरील पेव्हर ब्लॉक जमिनीपासून उखडले असून त्यात पाय अडकून पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. तर या पेव्हर ब्लॉकमध्ये पाणी साचून ते चिखलाचे पाणी अंगावर उडून नागरिकांचे कपडे खराब होण्याचे प्रकार देखील वारंवार घडत आहे. तसेच या पदपथावर रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो त्यामुळे येथून चालणे म्हणजे पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच या उखडलेल्या पेव्हर ब्लॉकच्या बाजूला असणारे सिमेंटची गटारांची झाकणे देखील तुटलेली आहेत. त्यामुळे पादचारी त्यात अडकून पडण्याच्या घटना देखील वारंवार घडत आहेत. तर रोडवरून चालनामुळे गाड्यांचा अंदाज ना आल्यामुळे अपघातात सातत्याने वाढ होत आहे. तरी महापालिका प्रशासनाने ह्या पदपथावरील पेव्हर ब्लॉक पूर्णपणे काढून टाकून हे पदपथ डांबरीकरण करावे अशी मागणी स्थानिक रहिवाशी आणि चाकरमानी पादचारी करत आहेत.
या पदपथावरील अनेक पेवर ब्लॉक आणि पुरातन सिमेंटची दगडे उकडलेल्या अवस्थेत असल्याबाबत अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाले आहेत त्यानुसार मी महापालिका प्रशासनाकडे हे पद नवीन बनवण्याबाबत पत्र दिले असून लवकरच यावर कारवाई होऊन नवीन पदपथ बनवण्यात येईल अशी माहिती नगरसेवक
मकरंद नार्वेकर यांनी दिली.JS/ML/MS
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade