पशुपालकांना देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये महत्त्वाचे बदल
पशुपालकांना देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये महत्त्वाचे बदल
मुंबई,दि. २८ : गेल्या वर्षी जून ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर जनावरांचे मृत्यू व गोठ्यांचे नुकसान झाले. यासाठी राज्य सरकारने मदत योजनेत महत्त्वाचे बदल करून सर्व पशुपालकांना सरसकट मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आधी नियमांमुळे वगळले गेलेले शेतकरीही आता मदतीस पात्र ठरणार आहेत. या निर्णयामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना काहीसा आर्थिक आधार मिळणार आहे.
व्या नियमांतील बदल
भूमिहीन किंवा अल्पभूधारकांपुरते मर्यादित न ठेवता सर्व अपादग्रस्त पशुपालकांना मदत मिळणार.
जनावरांच्या संख्येवर असलेली मर्यादा रद्द करून मृत किंवा बेपत्ता झालेली सर्व जनावरे मदतीस पात्र ठरणार.
कुक्कुटपालनासाठीही मर्यादा काढून टाकली असून सर्व मृत किंवा बेपत्ता पक्ष्यांसाठी मदत मिळणार.
मदतीचे तपशील
पडझड झालेल्या गोठ्यांसाठी ₹3,000 मदत.
मृत दुधाळ जनावरांसाठी ₹37,500 प्रति जनावर.
ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी ₹32,000 प्रति जनावर.
हान जनावरांच्या मृत्यूसाठी ₹20,000.
शेळी व मेंढीसाठी ₹4,000 प्रति जनावर.
कुक्कुटपालन करणाऱ्यांना प्रति कोंबडी ₹100 मदत
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade