शालेय पाठ्यपुस्तकात अजितदादांच्या जीवन कार्यावर आधारित धडा घेण्याची आमदार राजकुमार बडोले यांची विधानसभेत आग्रही मागणी
शालेय पाठ्यपुस्तकात अजितदादांच्या जीवन कार्यावर आधारित धडा घेण्याची आमदार राजकुमार बडोले यांची विधानसभेत आग्रही मागणी
मुंबई - राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा प्रशासकीय दरारा… कामाचा धडाका आणि विकासाची दूरदृष्टी आता पुढच्या पिढीला अभ्यासता यावी, यासाठी त्यांच्या जीवनावर आधारीत एक विशेष धडा शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजकुमार बडोले यांनी विधानसभेत आज केली.
अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान बोलताना आमदार राजकुमार बडोले यांनी ही महत्वपूर्ण मागणी केली.
दरम्यान राजकुमार बडोले यांनी अजितदादा पवारांच्या कार्यशैलीचे विविध पैलू मांडत, हा विषय शिक्षण विभागाने गांभीर्याने घ्यावा असे आवाहनही केले.
आमदार बडोले यांनी सभागृहात अजितदादा पवारांच्या व्यक्तिमत्त्वातील अशा काही गुणांचा उल्लेख केला ज्यामध्ये दादांची शिस्त आणि वक्तशीरपणा… प्रशासकीय पकड आणि कठोर आर्थिक शिस्त…जनता दरबार… बांधकाम आणि गुणवत्ता… पर्यावरण प्रेम…
तंत्रज्ञानाचा स्वीकार याचा समावेश असावा असे मांडले.
अजितदादांची सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करण्याची पद्धत सर्वश्रुत आहे.पहाटे ५ वाजल्यापासून प्रशासकीय कामांचा निपटारा करणे आणि अधिकाऱ्यांना कामाला लावणे, हा त्यांचा ‘ट्रेडमार्क’ पॅटर्न होता. राज्याच्या तिजोरीचा कणा मानल्या जाणाऱ्या अर्थमंत्रालयावर त्यांची असलेली पकड आणि सरकारी निधीचा विनियोग करताना पाळली जाणारी कठोर आर्थिक शिस्त, हा अभ्यासाचा विषय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरु शकतो असेही राजकुमार बडोले म्हणाले.
अजितदादांचा जनता दरबार हा तर राज्यातील कुठल्याही नेत्यांचा नसेल इतका मोठा जनता दरबार होत होता. या दरबारात जनतेच्या समस्या थेट ऐकून घेऊन त्या जागेवर सोडवण्याची त्यांची पद्धत ही लोकशाहीतील जनसंवादाचा एक उत्तम नमुना होता.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade