वरळी येथील समाधान शिबिर जल्लोषात संपन्न
वरळी येथील समाधान शिबिर जल्लोषात संपन्न
मुंबई-वरळी येथील लाला लजपत राय महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेले “छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान” यशस्वीरित्या संपन्न झाले.
या शिबिरामध्ये वरळी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत महाराष्ट्र शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा मोठ्या प्रमाणावर घेतला.
अनेक नागरिकांनी आपले जन्म, मृत्यूचे दाखले या शिबिरात मिळवले.
यावेळी विधानपरिषद उपसभापती सचिनभाऊ अहिर, नगरसेविका वनिता दत्ता नरवणकर,भाजप नेते किरण शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व शासकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांचे मनःपूर्वक आम्ही मनापासून आभार मानतो. तसेच अशा प्रकारचे समाधान शिबिर प्रत्येक महिन्यात व्हावे यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant