प्रज्ञा जांभेकर लिखित ‘उधार का उजाला’ या हिंदी कवितासंग्रहाचे गुरुवारी प्रकाशन
प्रज्ञा जांभेकर लिखित ‘उधार का उजाला’ या हिंदी कवितासंग्रहाचे गुरुवारी प्रकाशन
मुंबई-: सदामंगल पब्लिकेशन प्रकाशित आणि कवयित्री प्रज्ञा जांभेकर लिखित ‘उधार का उजाला’ या हिंदी कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ गुरुवार, ३० जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजतां प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये होणार आहे. प्रकाशक आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी ही माहिती दिली.
या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि साहित्यिक विनय हर्डीकर हे भूषविणार असून ज्येष्ठ कवी आणि अभिनेते किशोर कदम, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
‘उधार का उजाला’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशनानिमित्ताने काव्यरसिकांसाठी विशेष काव्य अभिवाचनाचेही आयोजन करण्यात आले आहे. सुनील कांबळे, राजेश शिरभाते आणि सानिका गोडसे हे पुस्तकातील निवडक कवितांचे अभिवाचन करणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र हुंजे करणार आहेत. संवेदनशील भावविश्व मांडणाऱ्या ‘उधार का उजाला’च्या प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमी आणि काव्यरसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सदामंगल पब्लिकेशनतर्फे करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade