रक्तदानाने आपण एखाद्याचा जीव वाचवु शकतो, शशिकांत निकम, शिवसेना शिवडी विधानसभा प्रमुख
रक्तदानाने आपण एखाद्याचा जीव वाचवु शकतो, शशिकांत निकम, शिवसेना शिवडी विधानसभा प्रमुख
मुंबई-रक्तदान हेच सर्वात श्रेष्ठ दान असून नागरिकांनी रक्तदान जरूर करावे. नियमित रक्तदान केल्याने आपण अनेक रुग्णाचा जीव वाचवू शकतो असा सामाजिक संदेश शिवसेना शिवडी विधानसभा विभाग प्रमुख शशिकांत निकम यांनी काळाचौकी येथील शिवाजी हॉल येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात दिला. या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले. या शिबिरात प्रत्येक रक्तदात्यास उत्कृष्ट भेटवस्तू आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला
रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान असून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे. रक्तदान केल्यामुळे आपण एखाद्याचा जीव वाचवू शकतो. याच भावनेतून आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून यापुढे देखील आम्ही अशाच प्रकारे सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा विषय कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याची माहिती शिवसेना शिवडी विधानसभा विभागप्रमुख शशिकांत निकम यांनी दिली. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा, सभापती सचिन अहिर, माजी आमदार दगडू दादा सकपाळ, महिला विभाग प्रमुख रेश्मा गावकर सकपाळ, कुणाल प्रभुणे, सानिया लोकाधिकार सेनेचे पदाधिकारी देवेंद्र कदम, संतोष बामणे आणि सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade