मुंबईत होतोय देशातील पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त पादचारी पूल
मुंबईत होतोय देशातील पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त पादचारी पूल
मुंबई-: देशातील पहिला पादचारी पुलावरील ट्रॅव्हलेटर्स MMRDA कडून मुंबईतील महालक्ष्मी येथे तयार होत आहे. याचे 90 टक्के काम सध्या पूर्ण झाले आहे. महालक्ष्मी रेल्वे स्थानक, मेट्रो-३ स्थानक आणि संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानक यांना एकाच स्कायवॉकने जोडले जाणार कस काय वॉक वर हा ट्रॅव्हलेटर्स तयार करण्यात आलेला आहे. हा एकात्मिक इंटरचेंज मार्ग सुरु झाल्यानंतर स्थानकांदरम्यान बदलण्यासाठी लागणारा वेळ सुमारे 20 मिनिटांनी कमी होईल. यामुळे दक्षिण मुंबई आणि वरळी परिसरातून मुंबई मोनोरेलपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल. मेट्रो, मोनोरेल आणि उपनगरीय रेल्वे यांच्यातील प्रवास अधिक जलद आणि सुलभ होईल. तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होईल.
हा पूल सुमारे २८३ मीटर लांब आणि ११ मीटर रुंद आहे. त्यामुळे प्रवाशांना सुरळीत हालचाल करता येणार आहे. एकूण १७६ मीटर लांबीचे सहा ट्रॅव्हलेटर्स असून सर्वसमावेशक प्रवेशासाठी दोन प्रवासी लिफ्ट्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या माध्यमातून प्रति तास सुमारे ४ हजार ५०० प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant