Bajaj Auto कडून निर्यातीचा विक्रम, आंतरराष्ट्रीय विक्रीत ५४% वाढ
Bajaj Auto कडून निर्यातीचा विक्रम, आंतरराष्ट्रीय विक्रीत ५४% वाढ
मुंबई-: भारतातील वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी बजाज ऑटोने (Bajaj Auto) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्रमी कामगिरी करत निर्यातीत तब्बल ५४ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. कंपनीने पहिल्यांदाच एका तिमाहीत ७.३२ लाखाहून अधिक वाहनांची (दुचाकी आणि व्यावसायिक) विक्रमी निर्यात केली आहे. लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकन देशांमध्ये कंपनीच्या गाड्यांची प्रचंड मागणी पाहायला मिळाली. तसेच व्यावसायिक वाहनांच्या निर्यातीत वार्षिक आधारावर ७०% ची मोठी वाढ झाली आहे.
कंपनीने भागधारकांना दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जून या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा २,९८२.८४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षाच्या याच कालावधीतील २,०९५.९८ कोटी रुपयांच्या तुलनेत यामध्ये ४२.३% ची घसघशीत वाढ झाली आहे.
कंपनीच्या एकूण महसुलानेही मोठी झेप घेतली आहे. गेल्या वर्षी १२,५८४.४५ कोटी रुपये असलेला परिचालन महसूल या तिमाहीत ३७% वाढून १७,२४३.७२ कोटी रुपये झाला आहे. वाहनांची विक्रमी विक्री आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे योग्य मूल्य यामुळे कंपनीच्या उत्पन्नात ही मोठी वाढ शक्य झाली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant