शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पेन्शनर्स असोसिएशनचे विविध मागण्यासाठी आझाद मैदानात आंदोलन
शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पेन्शनर्स असोसिएशनचे विविध मागण्यासाठी आझाद मैदानात आंदोलन
मुंबई-मुंबई महानगरपालिका परिक्षेत्र विविध माध्यमांच्या विविध व्यवस्थापनाच्या 377 खाजगी प्राथमिक आणि शाळा सुरू आहेत. शाळांमध्ये सुमारे 3500 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत असून या अनुदानित शाळा मधून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संख्या 4500 इतकी असून या सर्व कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे सर्व लाभ देण्याची संपूर्ण जबाबदारी मापालिकेची असून आम्हाला योग्य तो मोबदला आणि लाभ मिळत नसल्याबाबतशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी आझाद मैदान येथे आमरण आंदोलन सुरू केले असून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन असेच सुरू राहील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
ते पुढे म्हणाले मुंबई महानगरपालिका ने स्वतःचे कर्मचाऱ्यांना जानेवारी 2019 मध्ये सातवा वेतन आयोग लागू केला तसेच त्याच अनुषंगाने जे असलेले सर्व फायदे सेवानिवृत्ती, वेतन कुटुंब, निवृत्ती वेतन, स्वेच्छेने निवृत्ती वेतन, निवृत्ती उपदान, मृत्यू उपदान, निवृत्त वेतनाचे अंश राशीकरण महागाई भत्ता रजा रोखीकरण हे आर्थिक फायदे दिले आहेत. त्याचप्रमाणे दिनांक एक एक 2016 पासून ते डिसेंबर 2018 पर्यंतची 48 महिन्यांची सातवा आयोगाची संपूर्ण थकबाकी देखील दिलेली आहे. त्याच मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर अनुदानित खाजगी प्राथमिक शाळांसाठी त्याचवेळी म्हणजेच माहे जानेवारी 2019 मध्ये सातवा वेतन आयोग लागू करणे अपेक्षित होते परंतु सुमारे चार वर्षे उशिरा होऊन सप्टेंबर 2023 मध्ये सातवा वेतन आयोग लागू केला खाजगी प्राथमिक अनुदानित शाळांमधून शेवाळविरुद्ध झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्याप सत्व वेतन आयोग लागू केलेलं नाही. यावरून मुंबई महानगरपालिका प्रशासन मनपा कर्मचारी आणि खाजगी अनुदानित शाळेचे कर्मचारी यांचे प्रचंड भेदभाव आहे. त्यामुळे आता आम्हाला भेदभाव नको आम्हाला आमचा मोबदला हवा. त्यामुळे सन 1997 पासून ते 2026 पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या सुमारे 4500 जेष्ठ नागरिक कर्मचाऱ्यांवर हा फार मोठा आर्थिक अन्याय आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन सुरू केले असून आमचे हे आंदोलन अजूनच तीव्र होणार अशी माहिती शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी या आंदोलनादरम्यान दिले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर