बुलेट ट्रेन प्रकल्पावरून जपानच्या मंत्र्यांचे भारतावर गंभीर आरोप
बुलेट ट्रेन प्रकल्पावरून जपानच्या मंत्र्यांचे भारतावर गंभीर आरोप
मुंबई-: जपानमधील लोक वेळ पाळणे आणि कामातील शिस्तीबाबतीत अतिशय काटेकोर असतात. काही मिनिटांची दिरगाईही त्यांना सहन होत नाही. त्यामुळे भारतीय दिरगाई व्यवस्थेसोबत काम करताना त्यांना खूपच कठीण जाते. भारत-जपान एकत्रितपणे सुरू असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प प्रकल्पाला झालेल्या विलंबामुळे खर्चात ८० टक्क्यांची वाढ झाली आहे. या प्रकल्पावरील खर्च १.१ लाख कोटीवरून १.९८ लाख कोटींवर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर जपानच्या माजी मंत्र्यांनी नाराजी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जपानच्या माजी मंत्री हिदेकी माकिहारा यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पावरून भारतवर गंभीर आरोप केले आहेत. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी झालेल्या विलंबावरून त्यांनी भारतावर ताशेरे ओढले आहेत.
भारत बेजबाबदार असून आश्वासनं पूर्ण करत नाही, असे सनसनाटी आरोप करत जपानच्या माजी मंत्र्यांनी केले आहेत.
मी स्वत: भारतात शिंकानसेन प्रकल्पाशी (मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प) संबंधित होतो. पण या प्रकल्पात काही गोष्टी मला खटकल्या. आंतरराष्ट्रीय बैठका आणि चर्चांमध्ये भारताकडून बराच विलंब झाला. भारताकडून प्रचंड बेजबाबदारपणा झाला,’ असे आरोप जपानचे माजी मंत्री हिदेकी माकिहारा यांनी केले.
‘या प्रकल्पात जपानच्या अनेक लोकांनी स्वत:ला झोकून दिलं. त्यांच्यासाठी मी हे लिहितोय. हा प्रकल्प पुढे जाऊ शकत नाही याची १०० टक्के जबाबदारी भारताची आहे. पंतप्रधान ताकाइची यांच्या दौऱ्यातूनही काही हाती लागलं नाही. भारत शिंकानसेन प्रकल्प फेल: सुरक्षेसाठी महत्त्वाच्या सिग्नल यंत्रणेपासून जपानला बाहेर ठेवण्यात आलं,’ अशा शब्दांत माजी मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant