दशावतारी व भजनी कलाकारांना पेन्शन देण्यात यावे ; आमदार सुनील प्रभू यांची मागणी
दशावतारी व भजनी कलाकारांना पेन्शन देण्यात यावे ; आमदार सुनील प्रभू यांची मागणी
मुंबई-: दशावतारी व भजनी कलाकारांना पेन्शन देण्यात यावी अशी मागणी शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत केली. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी याबाबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.
बुधवारी विधानसभा सभागृहात आमदार निलेश राणे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून “दशावतारी कलाकारांच्या विविध समस्यांबाबत प्रश्न मांडला. त्यावर शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी दशावतारी कलाकार व भजनी कलाकार यांना उतार वयात कोणतीही आर्थिक मदत दिली जात नसून त्यांना निदान पेन्शन देण्यात यावे अशी सूचना केली. 2019 साली तात्कालीन सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्याकडे दशावतारी व भजनी कलाकारांना पेन्शनबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करावी अशी मागणी देखील केली होती.
हा विषय गांभीर्याने घेऊन दशावतारी व भजनी मंडळातील कलाकारांना पेन्शन रूपाने मदत करावी त्यामुळे त्यांना दिलासा मिळेल, असे शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी सभागृहात सांगितले
याबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या विषयावर कमिटी बसवून या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे असे सांगितले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर