दहिसर भाईंदर मेट्रोला आता सात एप्रिलचा मुहूर्त
दहिसर भाईंदर मेट्रोला आता सात एप्रिलचा मुहूर्त
मुंबई - दीर्घकाळाची प्रतीक्षेनंतर आता मुंबईच्या उत्तरेकडील उपनगरांतील प्रवाशांसाठी दहिसर पूर्व ते मिरा-भाईंदर दरम्यान धावणारी मेट्रो लाईन ९ अखेर ७ एप्रिलपासून सुरू होणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. या आधी ३ एप्रिल त्यानंतर ६ एप्रिल असे करत करत अखेर या मेट्रोसाठी 7 एप्रिलचा मुहूर्त ठरला आहे.मेट्रो लाईन ९ च्या पहिल्या टप्प्याची २ एप्रिल रोजी काशीगाव ते दहिसर दरम्यान यशस्वी चाचणी घेण्यात आली. यापूर्वी ३ एप्रिलला उद्घाटन होणार होते, मात्र ते पुढे ढकलण्यात आले होते.
माध्यमांशी संवाद साधताना सरनाईक म्हणाले की, काही कारणांमुळे उद्घाटनास विलंब झाला. “सुरक्षा मान्यता मिळण्याची आम्ही वाट पाहत होतो, ती आता मिळाली आहे. त्यामुळे ७ एप्रिल रोजी या मार्गाचे उद्घाटन निश्चित करण्यात आले आहे,” असे त्यांनी सांगितले. ही सेवा सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांची दीर्घकाळाची प्रतीक्षा संपणार असून, प्रवास अधिक सोयीस्कर होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
मेट्रो लाईन ९ चा पहिला टप्पा ४.५ किलोमीटर लांबीचा असून, दहिसर पूर्व ते काशीगाव दरम्यान धावणार आहे. या मार्गावर पांडुरंग वाडी आणि मिरागाव ही स्थानके असणार आहेत. हा मार्ग छोटा असला तरी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे, कारण यामुळे मेट्रो सेवा उत्तरेकडील भागांपर्यंत विस्तारली जाणार आहे.
दहिसर पूर्व येथे मेट्रो लाईन ७ शी जोडणी होणार असून, मिरा रोड आणि आसपासच्या भागातून अंधेरी पूर्वेतील गुंडवलीपर्यंत थेट प्रवास करता येणार आहे. तसेच मेट्रो लाईन २एशी इंटरचेंज उपलब्ध होणार असल्याने अंधेरी पश्चिम आणि शहरातील इतर भागांशी संपर्क अधिक सुलभ होणार आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant