रायगड समुद्रात मासेमारी बोट बुडाली,बचाव कार्य सुरू
रायगड समुद्रात मासेमारी बोट बुडाली,बचाव कार्य सुरू
अलिबाग - रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात रायगड समुद्रामध्ये मासेमारी बोट बुडाल्याची घटना घडली असून, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता करंजा रिप्स येथे ही घटना घडली आहे. दरम्यान ही मासेमारी नौका गुजरात येथील असल्याचे समजत आहे.
घटनेची माहिती मिळताच सीआयएसएफ, आणि नौदालाच्या गस्त नकाद्वारे बचावकार्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र अपघात कशामुळे झाला, बोटीवर किती खलाशी होते? जिवीत हानी आहे का? किती नुकसान झाले? याबाबत काही खलासा झालेला नाही.
महत्वाचे म्हणजे वादळी हवामानामुळे मासेमारी बंदी असतानाही सदरची बोट समुद्रात आली कशी तेही गुजरातची. नक्की प्रकार काय? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सदर घटनेसंदर्भात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मत्स्य परवाना विभाग,कस्टम, पोलीस यांनी सदर घटनेसंदर्भात जातीने लक्ष केंद्रित करावे अशी मागणी कोळी बांधवांकडून करण्यात येत आहे. अद्याप शोधकार्य सुरू असून अधिकृत माहिती मिळाली नाही.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade