लवकरच करता येणार कर्जत – पनवेल थेट रेल्वे प्रवास
लवकरच करता येणार कर्जत – पनवेल थेट रेल्वे प्रवास
मुंबई - मुंबई-कर्जत-पनवेल असा थेट प्रवास लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल कमी होतील आणि प्रवास अधिक सोयीस्कर होईल. मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग ठरणारा कर्जत-पनवेल रेल्वे कॉरिडॉर लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. जवळपास 29.6 किमी लांबीच्या या मार्गाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-3 (MUTP-3) अंतर्गत हाती घेतलेल्या या प्रकल्पासाठी 2,782 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे.
हा मार्ग डोंगराळ प्रदेशातून जात असल्याने यासाठी वावरले, नधाळ आणि किरवली येथे तीन बोगदे तयार करण्यात आले आहेत. तिन्ही बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले आहे. याशिवाय 47 पुलांपैकी 29 छोटे आणि 6 मोठे पूल पूर्ण झाले आहेत.
या मार्गावर पनवेल, मोहोपे आणि कर्जत अशी तीन महत्त्वाची स्थानके असतील. दोन जुन्या स्थानकांना नव्या मार्गिकेशी जोडण्यात आले आहे, ज्यामुळे उपनगरीय रेल्वे नेटवर्क अधिक सक्षम होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवासी वाहतुकीत मोठा बदल होईल आणि स्थानिक तसेच प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना मिळेल.
नवीन रेल्वे मार्ग तयार झाल्याने कर्जत आणि पनवेलमधील प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. या प्रकल्पामुळे केवळ प्रवासाचा वेळच कमी होणार नाही तर मुंबईच्या उपनगरातील वाहतुकीवरील ताण देखील काही प्रमाणात कमी होईल.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya